१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील चार आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 07:15 PM2022-05-30T19:15:21+5:302022-05-30T19:16:32+5:30
1993 Mumbai Serial Bomb Blast : अबू बकर, युसूफ भक्त, शोएब बाबा आणि सय्यद कुरेशी अशी आरोपींची नावे आहेत.
अहमदाबाद : मुंबईतील १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटातील चार आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले. याआधी २३ मे रोजी सीबीआयने त्यांना न्यायालयात हजर केले, त्यानंतर आरोपींना सात दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांनतर ती सीबीआय कोठडी संपल्यानंतर आज कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अबू बकर, युसूफ भक्त, शोएब बाबा आणि सय्यद कुरेशी अशी आरोपींची नावे आहेत.
या चारही आरोपींना गुजरात एटीएसने अटक केली होती. त्यानंतर सीबीआयने त्यांना ताब्यात घेतले होते. या चार आरोपींना सीबीआयने न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी या सर्व आरोपींना सा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. त्याची मुदत आज संपत असल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Mumbai | CBI took custody of four 1993 serial blasts accused from Gujarat ATS. The court remanded them 7-day custody after they were produced before it, today.
— ANI (@ANI) May 23, 2022