१४ कोटींचे चरस जप्त करत चौघांना अटक; श्रीनगरहून कारमधून मुंबईत आणले ड्रग्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 03:09 PM2021-10-27T15:09:47+5:302021-10-27T15:11:19+5:30
Charas seized in mumbai : पोलिसांना याची माहिती मिळाली आणि सर्व आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडले.
श्रीनगरहून कारमधून मुंबईत ड्रग्ज आणणाऱ्या एका टोळीचा मुंबईपोलिसांनी पर्दाफाश केला आहे. जे शहरातील अनेक भागात ड्रग्जचा पुरवठा करतात. या टोळीत पुरुषांसोबत महिलांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे हे लोक जम्मू-काश्मीरमधून ड्रग्ज आणून मुंबईत विकायचे.
मुंबई क्राईम ब्रँचच्या ताब्यात असलेले हे सर्वजण मुंबईचे मोठे ड्रग्ज सप्लायर आहेत. ही टोळी मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रात ड्रग्जचा पुरवठा करते. आजही ही टोळी श्रीनगरमधून २४ किलो चरस आणून मुंबईला पुरवणार होती. मात्र पोलिसांना याची माहिती मिळाली आणि सर्व आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडले.
Four people including 2 women were arrested with 24 kg of charas worth Rs 14.4 crores that they were transporting from Rajasthan to Mumbai yesterday. All accused are residents of Powai area of Mumbai: Crime Branch of Mumbai Police pic.twitter.com/EbD2nsFaqs
— ANI (@ANI) October 26, 2021
अटक करण्यात आलेल्या टोळीकडून पोलिसांनी २४ किलो चरस जप्त केला आहे. ज्याची किंमत सुमारे १४ कोटी ४० हजार आहे. विशेष बाब म्हणजे ड्रग्जची ही खेप एका सेंट्रो कारमधून श्रीनगरहून मुंबईत आणण्यात आली होती. सर्व आरोपी हे पवईचे रहिवासी आहेत.