साखळी पद्धतीने नशेच्या गोळ्या विक्री करणारे चौघे अटकेत

By राम शिनगारे | Published: September 18, 2022 09:42 PM2022-09-18T21:42:08+5:302022-09-18T21:42:18+5:30

एनडीपीएस पथकाची कारवाई : १ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त

Four arrested for selling drug pills in chain mode | साखळी पद्धतीने नशेच्या गोळ्या विक्री करणारे चौघे अटकेत

साखळी पद्धतीने नशेच्या गोळ्या विक्री करणारे चौघे अटकेत

googlenewsNext

औरंगाबाद : दिल्लीगेटचा विक्रेता, बायजीपुऱ्यातुन नशेच्या गोळ्या घेऊन आझाद चौकात विक्री करीत असल्याचे समोर आले आहे. साखळी पद्धतीने नशेच्या गोळ्या विकणाऱ्या चौघांना एनडीपीएस पथकाने बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून १ लाख ६ हजार ९३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली. या प्रकरणी सिडको ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

सय्यद बाबर सय्यद काफीओद्दीन (रा़. दिल्लीगेट), शेख अफरोज शेख बाबु उर्फ भांजे (रा़. संजयनगर), शेख शहाजेब शेख फारूख ( रा. रोजाबाग) आणि शेख अतिक शेख मखसुद (रा. एकतानगर) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. एनडीपीएस पथकाचे सहायक निरीक्षक हरेश्वर घुगे यांच्या पथकास सय्यद बाबर हा आझाद चौकात नशेच्या गोळ्या विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा लावून बाबरला ताब्यात घेतले. बाबर हा दिल्लीगेटचा असताना आझाद चौकात येऊन गोळ्या विक्री करीत होता. त्याच्याकडे दहा गोळ्या सापडल्या. त्याने या गोळ्या संजयनगर, बायजीपुरा येथून अफरोज याच्याकडून आणल्याचे सांगितले. त्यानुसार अफरोजला ताब्यात घेतले. त्याच्याकडे २८ गोळ्या मिळाल्या. अफरोजने या गोळ्या रोजाबाग येथून शेख शहाजेब यांच्याकडून घेतल्या होत्या. त्यानुसार शहाबेजची ताब्यात घेत झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे ८० गोळ्या मिळाल्या. शहाजेब याने एकतानगर येथील शेख अतिक याच्याकडून गोळ्या घेतल्या होत्या़. एकतानगरमध्ये शेख अतिकच्या घरी छापा मारल्यावर पथकास ३० गोळ्या मिळाल्या. या चौघांना अटक केली आहे. ही कामगिरी निरीक्षक आघाव यांच्या मार्गदर्शनात सपोनि घुगे, सहायक फौजदार नसीम खान, अंमलदार विशाल सोनवणे, महेश उगले, धर्मराज गायकवाड, सुरेश भिसे, प्राजक्ता वाघमारे, दत्ता दुभळकर यांच्या पथकाने केली.


मुख्य विक्रेता फरार

एकमेकांकडून नशेच्या गोळ्या घेऊन विक्री करणाऱ्या चौघांना अटक केल्यानंतर या सर्वाना गोळ्या पुरविणारा सोहेल शेख ईस्माईल (रा. गरमपाणी) यास पकडण्यासाठी पथक त्याच्या घरी पोहचले. मात्र, ताेपर्यंत तो फरार झाला होता.

Web Title: Four arrested for selling drug pills in chain mode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.