हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी चार जणांना अटक, सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 03:28 PM2020-06-18T15:28:56+5:302020-06-18T15:36:12+5:30
नऱ्हे येथे भरदिवसा हॉटेल व्यावसायिकाचा खून झाला होता..
पुणे :नऱ्हे येथील हॉटेल व्यावसायिकाचा भर दिवसा कोयत्याने वार करून खून केल्याप्रकरणी चार जणांना सिंहगड रस्ता पोलिसांनीअटक केली आहे. आकाश नितीन दामगुडे (वय: २६, नांदेडसिटी, पुणे)संतोष रामचंद्र नातकी (वय:२८, शनीनगर , कात्रज, पुणे) गणेश तुकाराम गावरे (वय: २२, अप्पर इंदिरानगर, पुणे) सुधीर राजाराम कामठे (वय: २२, कुसगाव, ता. भोर, पुणे) अशा चौघा आरोपीना पोलिसांनीअटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
शुक्रवारी( ता. १२ जून) सायंकाळी सहा वाजनेच्या सुमारास हॉटेल व्यावसायिक सुनील लांगोरे (वय : ४०, रा. नऱ्हे, पुणे) हे हॉटेल समोर उभे असताना अज्ञात चार तरुणांनी त्यांच्यावर कोयत्याने वार करून खून केला. त्यानंतर ते पळून गेले. घटनेच्या ठिकाणी व येणाऱ्या - जाणाऱ्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज पाहून त्यांचे विश्लेषण करून तसेच पोलीस कर्मचारी श्रीकांत दगडे यांना बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीवरून सदर आरोपींची नावे उघड झाली. सिंहगड रस्ता पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण दहशतवादी विरोधी पथक व गुन्हे शाखा युनिट २ यांनी संयुक्तिक कामगिरी करून सदर चारही आरोपींना विविध ठिकाणांवरून ताब्यात घेतले.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड , सहा पोलीस आयुक्त पी डी राठोड , वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकिशोर शेळके, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल ताकवले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि चेतन थोरबोले, पोउपनि सुधीर घाडगे, पोलीस कर्मचारी दत्ता सोणवणे, दयानंद तेलंगेपाटील, श्रीकांत दगडे, पुरुषोत्तम गुन्ला, सचिन माळवे, योगेश झेंडे, हरीश गायकवाड, बालाजी जाधव, किशोर शिंदे, अविनाश कोंडे, राहुल शेडगे, राजेश गोसावी, यशवंत ओंबासे, मोहन भुरूक, राजेंद्र सुर्वे यांनी केली.सदर गुन्ह्याचा पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके करीत आहेत.