व्यवहारातून भावांचे अपहरण करणाऱ्या चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 01:16 AM2019-02-07T01:16:32+5:302019-02-07T01:17:06+5:30
पैशाच्या व्यवहारातून दोघा भावांचे अपहरण करून त्याला मारहाण करून सोडून देणाºया चौघांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली.
पुणे : पैशाच्या व्यवहारातून दोघा भावांचे अपहरण करून त्याला मारहाण करून सोडून देणाºया चौघांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली.
रणजित दिलीप जाधव (वय २६, रा. सोलापूर), वैभव आण्णासाहेब पवळ (वय२६, रा़ अहमदनगर), शिवाजी भगवान सरगर (वय २४, रा़ सोलापूर) आणि औंदुंबर दादाहरी चव्हाण (वय ३०, रा. उस्मानाबाद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़ याप्रकरणी धनाजी महादेव सावंत (वय २७, रा़ सोलापूर) यांनी स्वारगेट पोलिसात फिर्याद दिली. हा प्रकार २९ जानेवारी सायंकाळी ४ ते ३० जानेवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान घडला़ चौघांनी धनाजी व त्याच्या भावाला जीपमधून पुण्यातून पंढरपूर येथे नेले. तेथे त्यांनी आमच्या पैशाच्या व्यहाराचे काय करता असे म्हणत लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर शिरभावी येथील कॅनॉलवर धनाजी यांना सोडून भाऊ दत्तात्रय याला घेऊन गेल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास करून चौघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता दोघा भावांना आरोपी कोठे कोठे घेऊन गेले, ज्या ठिकाणी नेले तेथे जाऊन तपास करायचा आहे, गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या जप्त करायची असून त्यांचे इतर कोण साथीदार याबाबतही तपास करायचा असल्याने चौघांनाही पोलिस कोठडी देण्याची मागणी संजय दिक्षीत यांनी केली.