बंगळुरूमध्ये नर्सवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी दिल्लीतील चार जलतरणपटूंना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 02:10 PM2022-03-30T14:10:09+5:302022-03-30T14:17:39+5:30

GangRape Case : यादरम्यान दोघांनी एकमेकांना आपले नंबर दिले आणि त्यांची मैत्री झाली.

Four Delhi swimmers arrested for gang-raping nurse in Bangalore | बंगळुरूमध्ये नर्सवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी दिल्लीतील चार जलतरणपटूंना अटक

बंगळुरूमध्ये नर्सवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी दिल्लीतील चार जलतरणपटूंना अटक

googlenewsNext

बंगळुरू -  बंगळुरू पोलिसांनी एका नर्सवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी दिल्लीतून चार जलतरणपटूंना अटक केली आहे. हे सर्व बंगळुरू येथे प्रशिक्षणासाठी आले होते, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, आरोपींपैकी एक रजत गेल्या आठवड्यात एका डेटिंग अॅपद्वारे २२ वर्षीय पीडितेच्या संपर्कात आला होता. यादरम्यान दोघांनी एकमेकांना आपले नंबर दिले आणि त्यांची मैत्री झाली.

24 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता

पीडितेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी २४ मार्च रोजी सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तक्रारीनुसार, रजतने तरुणीला भेटण्यासाठी न्यू बेल रोडवरील हॉटेलच्या खोलीत बोलावले होते. रात्रीचे जेवण आटोपून मुलगी रजतला भेटायला गेली होती, तिथे त्याचे तीन मित्र आधीच हजर होते. तेथे पोहोचल्यानंतर चौघांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप तरुणीने केला आहे.

वैद्यकीय अहवालाने बलात्काराची माहिती समोर आली 

संजयनगर पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या वैद्यकीय अहवालात बलात्कार झाल्याची समोर आलीआहे. पोलिसांनी सांगितले की, रजत, शिव राणा, देव सरोही, योगेश कुमार अशी चार आरोपींची नावे आहेत. सर्वांचे वय सुमारे २० वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे.

तीन महिन्यांपूर्वी बंगळुरूला आले होते

रजत आणि शिव राणा हे तिघे आधीच बंगलोरला आले होते आणि भाड्याच्या घरात राहत होते. देव आणि योगेश गेल्या आठवड्यातच शहरात आले होते. सर्वजण पोहण्याच्या प्रशिक्षणासाठी बंगळुरूला आले होते. सध्या पोलिसांनी चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Web Title: Four Delhi swimmers arrested for gang-raping nurse in Bangalore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.