कुटुंबातील चौघांची केली हत्या; त्यापैकी एकाचा मृतदेह घेऊन पोचला पोलिसात  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 08:54 PM2019-10-17T20:54:53+5:302019-10-17T20:56:44+5:30

या घटनेमुळे पोलीस ठाण्यात एकच खळबळ माजली होती.

Four family members killed; Accuse has reached with One of them deadbody | कुटुंबातील चौघांची केली हत्या; त्यापैकी एकाचा मृतदेह घेऊन पोचला पोलिसात  

कुटुंबातील चौघांची केली हत्या; त्यापैकी एकाचा मृतदेह घेऊन पोचला पोलिसात  

Next
ठळक मुद्दे तीन मृतदेह ३५० किमी अंतरावर असलेल्या अपार्टमेंटमध्ये ठेवून आला होता. त्याने या हत्या का केल्या? हे अद्याप कळू शकलेले नाही. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

सॅन फ्रॅन्सिस्को - अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला पोलिसांनी चार जणांच्या हत्येप्रकरणी जेरबंद केले आहे. शंकर नागप्पा हांगुड (५३) असं या आरोपीचं नाव आहे. हा इसम आपल्या गुन्ह्याची कबुली देण्यासाठी नॉर्थन कॅलिफोर्निया पोलीस ठाण्यात कारमधून एक मृतदेह घेऊन गेला होता. तर तीन मृतदेह ३५० किमी अंतरावर असलेल्या अपार्टमेंटमध्ये ठेवून आला होता. या घटनेमुळे पोलीस ठाण्यात एकच खळबळ माजली होती.

शंकरने आपल्याच कुटुंबातील चार जणांची हत्या केली. हत्या करून त्यातील एक मृतदेह तो सोमवारी दुपारी पोलीस ठाण्यात कबुली देण्यासाठी कारमधून घेऊन गेला. पोलीस ठाण्यात पोहोचून त्याने आपण चार जणांची हत्या केली असल्याची कबुली पोलिसांना दिली. पोलिसांना त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. यानंतर तो जी कार घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला होता, पोलिसांनी त्याची तपासणी केली असता त्यांना त्यात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. रोजव्हीला शहरातील अपार्टमेंट शंकरने कुटुंबातील चौघांची हत्या केली. आयटी प्रोफेशनल असलेल्या शंकरने या हत्या का केल्या याचा पोलीस तपास करत आहेत.  पोलिसांनी त्याच्या घराची तपासणी केली असता पोलिसांना आणखी तीन मृतदेह आढळले. त्यामध्ये एक मृतदेह हा एका प्रौढ व्यक्तीचा तर दोन मृतदेह हे लहान मुलांचे असल्याचे पोलिसांना आढळून आले. 
पोलिसांनी शंकर याला अटक केली असून त्याने आपला गुन्हा कबुल केला आहे. त्याने या हत्या का केल्या? हे अद्याप कळू शकलेले नाही. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
 

Web Title: Four family members killed; Accuse has reached with One of them deadbody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.