युवकाने आई वडिलांसह घरातील चौघांना कायमच संपवलं; पत्नीने केला खळबळजनक आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 10:58 PM2023-04-16T22:58:49+5:302023-04-16T22:59:08+5:30
पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे
बांदा - यूपीच्या जनपद बांदा येथे एका गावात शनिवारी रात्री एकाच कुटुंबातील ४ जणांची गळा चिरून हत्या करण्यात आल्याने खळबळ माजली. एखाद्या लुटीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचा बनाव रचण्यात आला. परंतु तपासात कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचे समोर आले. या प्रकरणी मृताच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. तर पकडलेल्या आरोपीच्या पत्नीने पतीच खूनी असल्याचा दावा केला.
पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिकारी म्हणाले की, बालेंद्रचा वडील चुन्नूसोबत अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. हा वाद पत्नीवरून झाला होता. यामुळे पत्नी सुनीता माहेरी निघून गेली. कौटुंबिक वादातून बालेंद्रने कुटुंबातील चौघांची हत्या केली. त्यात आई वडील, वहिनी आणि मुलाला आरोपीने मारून टाकले.
युवकाला करायचं होतं दुसरं लग्न
घटनेनंतर ८ वर्षीय मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून आई सुनीता हॉस्पिटलला पोहचली, ती म्हणाली की, माझ्या नवऱ्यानेच आई वडील आणि मुलाला मारले आहे. जर मी घरात असते तर माझीही हत्या केली असती. याआधीही अनेकदा त्याने मला मारण्याचा प्रयत्न केला आहे. मी घाबरून माहेरी राहायला गेले. नवऱ्याला दुसरं लग्न करायचे होते. मात्र त्याच्या लग्नाच्या आड सर्व लोक येत होते. त्यामुळे कुटुंबातील सर्वांना संपवून त्याने दुसऱ्या लग्नाचा मार्ग मोकळा केला. सासरे पतीला जमीन देत नव्हते त्यामुळे दोघांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होता असा आरोप युवकाच्या पत्नीने केला.