भुसावळ येथील दुय्यम कारागृहातील अधीक्षकांसह चार रक्षकांवर खुनाचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2022 11:12 AM2022-03-30T11:12:34+5:302022-03-30T11:12:47+5:30
दोन वर्षानंतर शवविच्छेदन अहवाल प्राप्त
जळगाव: येथील दुय्यम कारागृहात सुनील भागवत (४०, रा, चांगदेव ता.मुक्ताईनगर ) या आरोपीस कारागृहात मारहाण करण्यात आली होती. यात त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी कारागृह अधीक्षक नागनाथ महादेव भानोसे यांच्यासह तुरुंग रक्षक तथा हवलदार सुभाष बाबुराव खरे , भानुदास निवृत्ती पोटे, सिताराम विठ्ठल कदम व अनिल श्रीराम बडगुजर पाच जणांवर वर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारहाणीची घटना ४ मार्च २०२० रोजी घडली होती. मंगळवारी रात्री हा गुन्हा दाखल झाला. डी .वाय . एस . पी. सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन पडगम तपास करीत आहे.