रिया चक्रवर्तीसह चौघांची होणार पॉलिग्राफ टेस्ट? सीबीआयकडून दुसऱ्या दिवशीही ७ तास चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 06:58 AM2020-08-30T06:58:09+5:302020-08-30T06:58:45+5:30
रियासह सुशांतसिंहचा मित्र सिद्धार्थ पिठानी, त्याचे नोकर दीपेश सावंत व नीरज सिंग हे आपल्या जबाबावर ठाम आहेत. त्यामागील सत्यता जाणण्यासाठी पॉलिग्राफ चाचणी करण्याचा अधिकाऱ्यांचा विचार आहे.
मुंबई : सुशांतसिंह मृत्यू प्रकरणातील प्रमुख संशयित अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह चौघा संशयितांची पॉलिग्राफ चाचणी करण्याच्या तयारीत सीबीआयचे अधिकारी आहेत. संबंधितांची मान्यता आणि न्यायालयाची परवानगी मिळाल्यास लवकरच ही चाचणी केली जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
रियासह सुशांतसिंहचा मित्र सिद्धार्थ पिठानी, त्याचे नोकर दीपेश सावंत व नीरज सिंग हे आपल्या जबाबावर ठाम आहेत. त्यामागील सत्यता जाणण्यासाठी पॉलिग्राफ चाचणी करण्याचा अधिकाऱ्यांचा विचार आहे. त्यासाठी संबंधित व्यक्ती आणि न्यायालयाची परवानगी लागते. रियाने त्यासाठी तयारी दर्शविल्याचे सांगण्यात येते. सीबीआयने रियाची सलग दुसºया दिवशी शनिवारी सात तासांहून अधिक काळ चौकशी केली. सांताक्रुझच्या डीआरडीओ गेस्ट हाउसमध्ये दुपारपासून रात्री पावणेनऊपर्यंत चौकशी झाली. तिला रविवारीही चौकशीला बोलाविण्याची शक्यता आहे. रियासह तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती, सुशांतचे आजी- माजी सीए श्रीधर आणि रजत मेवानी, मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, सिद्धार्थ पिठानी, नोकर दीपेश सावंत व नीरज सिंग यांचीही चौकशी झाली.
सुशांतच्या पैशाचा त्यांच्याकडून झालेला वापर, ड्रगसेवन, १५ कोटी वर्ग केल्याबद्दल विचारणा करण्यात आली. काही वेळा सर्वांना समोरासमोर बसवून त्यांच्याकडून प्रश्नोत्तरे करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.