डॉक्टर तरुणीवर बलात्कारानंतर हत्या करणाऱ्या चौघांना बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 16:08 IST2019-11-29T16:07:19+5:302019-11-29T16:08:42+5:30
पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ही अटक करण्यात आली आहे.

डॉक्टर तरुणीवर बलात्कारानंतर हत्या करणाऱ्या चौघांना बेड्या
हैदराबाद - हैदराबादमध्ये 26 वर्षीय वेटरनरी डॉक्टरवरबलात्कार करून या तरुणीला जाळून मारण्यात आले आहे. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला आहे. जळालेल्या मृतदेहाचे फोटो पाहून संपूर्ण देश हादरला आहे. याप्रकरणी सायबराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबराबाद पोलिसांनी प्राथमिक तपासानुसार आज मुख्य सूत्रधार ट्रक चालक मोहम्मद पाशाला अटक केली त्यानंतर इतर तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी मुख्य आरोपी मोहम्मद पाशाला बेडया ठोकल्यानंतर पाशासोबतच्या इतर आरोपींना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलं. पाशा हा महबूबनगर जिल्ह्यात राहणारा आहे. या आरोपींनी डॉक्टर तरुणीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला असल्याचा संशय पोलीस वर्तवत आहेत. पीडितेच्या हत्येचे कोडं उलगडण्यासाठी सीसीटीव्ही दृश्ये तपासली जात असून पोलिसांनी १० पथके नेमली आहेत. तसेच, श्वान पथकांचाही आधार घेतला जात आहे. पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ही अटक करण्यात आली आहे.