पोलीस असल्याची बतावणी करुन चौघांनी १५ लाखांना लुबाडले; कोंढव्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 11:41 AM2020-07-25T11:41:18+5:302020-07-25T13:42:58+5:30

लॉकडाऊनमध्ये गोदाम ठेवले उघडे : एकाला अटक

Four person fraud of 1 lakh, by use name of police, incident in Kondhwa | पोलीस असल्याची बतावणी करुन चौघांनी १५ लाखांना लुबाडले; कोंढव्यातील घटना

पोलीस असल्याची बतावणी करुन चौघांनी १५ लाखांना लुबाडले; कोंढव्यातील घटना

Next
ठळक मुद्देया प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद

पुणे : लॉकडाऊनच्या काळात गोदाम सुरु ठेवल्याचे सांगून गुन्हे शाखेचे पोलीस असल्याची बतावणी करुन चौघांनी १ लाख रुपये जबरदस्तीने घेऊन गेले.याप्रकरणी कोंढवापोलिसांनी तातडीने तपास करुन त्यातील एकाला अटक केली आहे. त्यानंतर खरा प्रकार उघडकीस आला असून चोरट्यांनी १ लाखांना नाही तर तब्बल १५ लाखांना लुबाडलेले  उघड झाले आहे.
याप्रकरणी प्रकाश पेमाराम भाटी (वय ३२, रा. अजमेरा पार्क, कोंढवा खुर्द) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चौघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना धर्मावत पेट्रोल पंपाच्या मागे मासाह यांच्या एका गोदामामध्ये २२ जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी २ यावेळेत घडली.
याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी विनोद ऊर्फ बाळ्या लक्ष्मण गोडांबे (वय ३३, रा. पाषाण) याला अटक केली आहे. 
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश भाटी यांचे किराणा मालाच्या साहित्याचे गोदाम अजमरा पार्क येथे आहे.२२ जुलै रोजी सकाळी ९ वाजल्याच्या दरम्यान चौघे जण त्यांच्या गोदामात आले. त्यांनी आम्ही क्राईम बँचचे पोलीस असल्याची बतावणी केली. लॉकडाऊनच्या काळात गोदाम कसे सुरु ठेवले. गुटखा विकतो का असे म्हणून त्यांना कारवाईची भिती दाखविली़ त्यानंतर बऱ्याचवेळ ते तेथेच थांबले. त्यानंतर त्यांनी कारवाई करायची नसेल तर पैसे द्यावे लागतील असे सांगून १ लाख रुपयांची मागणी केली. भाटी यांनी १ लाख रुपये दिल्यावर ते निघून गेले.या दरम्यान त्यांनी या पोलिसांचे मोबाईलवर रेकॉर्डिंग करुन ठेवले होते. हे पोलीस नसल्याची त्यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली. 
याबाबत सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे यांनी सांगितले की, भाटी यांच्यावर यापूर्वी कारवाई झाली आहे. हे हेरुन या चोरट्यांनी त्यांना लक्ष्य केले. त्यांनी वापलेल्या गाड्यांचे नंबर मिळाल्याने पोलिसांनी तातडीने विनोद गोडांबे याला अटक केली आहे. गोडांबे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, मारामारी असे गुन्हे दाखल आहे.त्याच्या साथीदारांची वर्णने मिळाली असून त्यांचा शोध सुरु आहे.
दरम्यान, विनोद गोडांबे याला पकडल्यानंतर पोलिसांना याबाबत खरी हकिकत समोर आली.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी सांगितले की, भाटी याच्यावर यापूर्वी गुटखा विक्री केल्याबद्दल कारवाई झाली होती. २२ जुलै रोजी तोतया पोलिसांनी त्याच्या गोदामावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकल्याचा बनाव केला़ त्यावेळी गोदामात गुटखा आढळून आला होता.त्यामुळे त्याने या चोरट्यांना तब्बल १५ लाख रुपये दिले़ त्यानंतर त्याने गोदामातील गुटखा दुसरीकडे हलविला व दुसऱ्या दिवशी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर तपासात हा सर्व प्रकार समोर आला आहे. त्याने गुटखा कोठे ठेवला याचा शोध सुरु आहे.

Web Title: Four person fraud of 1 lakh, by use name of police, incident in Kondhwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.