चार गावठी पिस्तुल, सात काडतुसे जप्त, तीन सराईत गुन्हेगार ताब्यात, भिगवण पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 07:38 PM2020-07-25T19:38:09+5:302020-07-25T19:38:29+5:30
भिगवण बस स्थानक परिसरात तीन जण गावठी पिस्तुल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
भिगवण : चार गावठी पिस्तुल व ७ जिवंत काडतुसांसह तीन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकासह भिगवण पोलिसांना यश मिळाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते भिगवण परिसरात गस्त करीत असताना भिगवण बस स्थानकावर तीन इसम गावठी पिस्तुलाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली.गोपनीय माहितीच्या आधारे दहशतवाद विरोधी पथकासह भिगवण पोलिसांच्या मदतीने बस स्थानक परिसरात सापळा रचून कारवाई केली.यात तीन संशयिताना ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ३ गावठी पिस्तुल आणि ८ जिवंत काडतूस मिळून आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.या कारवाईत तुषार विठ्ठल चितळे ( वय १९ रा.सुलेमान देवळा ता.आष्टी जि.बीड)
,अकिल उर्फ भागुजी भारत बरडे वय २६ रा .चोभानिमगाव ,कबीर महमद सय्यद वय ३४ रा.सुंदर नगर ,बीड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.सदर कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील ,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते ,उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर ,भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते यांच्यासह पोलीस हवालदार राजेंद्र मिरगे
,महेंद्र कोरवी ,लाशामान राऊत ,गोरख पवार इकबाल पठाण यांनी केली.