वेश्याव्यवसाय करणाऱ्या उझबेकिस्तानमधील चार महिलांना ड्रायव्हरसह अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 08:21 PM2022-03-02T20:21:44+5:302022-03-02T20:22:15+5:30
Prostitution : महिलांविरुद्ध वेश्याव्यवसाय आणि बेकायदेशीरपणे वास्तव्य केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांचे वय 23 ते 42 वर्षे आहे.
दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने वेश्याव्यवसाय करणाऱ्या विदेशी महिलांच्या टोळीचा पर्दाफाश केला असून चार विदेशी महिला आणि त्यांच्या वाहन चालकाला अटक केली आहे. उझबेकिस्तानच्या या महिला भारतात बेकायदेशीरपणे राहत होत्या. हरियाणातील तेज कुमार उर्फ तरुण हा चालक प्रत्येक परदेशी महिलेकडून दोन हजार रुपये कमिशन घेत असे. महिलांविरुद्ध वेश्याव्यवसाय आणि बेकायदेशीरपणे वास्तव्य केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांचे वय 23 ते 42 वर्षे आहे.
गुन्हे शाखेच्या डीसीपी मोनिका भारद्वाज यांनी सांगितले की, हवालदार राजेशला माहिती मिळाली होती काही विदेशी महिला भारतात बेकायदेशीरपणे राहून वेश्याव्यवसाय करणाऱ्या टोळ्या चालवत आहेत. तपासात नरेश उर्फ गोडू नावाचा एजंट विदेशी महिलांना वेश्याव्यवसायासाठी पुरवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. चार-पाच परदेशी मुलींच्या पुरवठ्यासाठी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पोलिसांशी संपर्क साधण्यात आला होता. एका महिलेसोबत 20 ते 25 हजारात सौदा ठरला. त्यानंतर पोलीस पथकाने ऋषी हॉटेल, वसंतकुंज रोड महिपालपूर येथे घेराव घातला आणि तेज कुमार (23) रा. गाव कराबरा मानकपूर, जिल्हा रेवाडी, हरियाणा येथे उझबेकिस्तानच्या चार महिला आणि स्विफ्ट डिझायर कारच्या चालकाला अटक केली.
परदेशी महिलांनी चौकशीदरम्यान सांगितले की, त्या टुरिस्ट व्हिसावर भारतात आली होती. व्हिसाची मुदत संपल्यानंतर ती येथे अवैधरित्या राहू लागल्या. त्यांचा खर्च भागवण्यासाठी वेश्याव्यवसायाची टोळी चालवायला सुरुवात केली. तेज कुमारने सांगितले की, नरेश उर्फ गोडू हा विदेशी महिलांचा पुरवठा करणारा एजंट हा त्याचा सख्खा भाऊ आहे. तो मुलींना परदेशातही पाठवत असे. तो अनेक वर्षांपासून वेश्याव्यवसायाची टोळी चालवत होता. नरेशच्या सांगण्यावरून तेज कुमार परदेशी महिलांना ग्राहकांकडे सोडत असे. नरेश पूर्वी ऑटो चालवायचा. तेव्हापासून परदेशी महिला त्याच्या संपर्कात आल्या होत्या.