Prostitution : तीन अल्पवयीन मुलींसह चार वारांगणा आढळल्या; महिलेला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 07:44 PM2021-05-18T19:44:13+5:302021-05-18T19:48:21+5:30

Prostitution Case : वाठोड्यातील कुंटणखान्यावर छापा

Four prostitutes found with three minor girls: Woman arrested | Prostitution : तीन अल्पवयीन मुलींसह चार वारांगणा आढळल्या; महिलेला अटक

Prostitution : तीन अल्पवयीन मुलींसह चार वारांगणा आढळल्या; महिलेला अटक

googlenewsNext
ठळक मुद्दे त्यांच्याकडून देहविक्रय करून घेणाऱ्या अर्चना शेखर वैंशपायन नमक महिलेला पोलिसांनी अटक केली.प्राथमिक तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार, प्रति ग्राहक दोन हजार रुपये घेणारी अर्चना वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुलीच्या हातात पाचशे रुपये ठेवत होती. आरोपी अर्चना वैंशपायन हिला अटक करून वेश्याव्यवसाय करणाऱ्या त्या चौघींचे जबाब नोंदविण्यात आले. 

नागपूर : वाठोड्यात सुरू असलेल्या एका कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने सोमवारी सायंकाळी छापा घातला. या छाप्यात तीन अल्पवयीन मुलींसह वेश्या व्यवसाय करणाऱ्या चार जणी सापडल्या. त्यांच्याकडून देहविक्रय करून घेणाऱ्या अर्चना शेखर वैंशपायन नमक महिलेला पोलिसांनी अटक केली.


अर्चना गेल्या अनेक महिन्यांपासून हा गोरख धंदा चालवते. प्रारंभी ती अजनीमध्ये आणि नंतर बहादुरा परिसरात भाड्याच्या सदनिकेत कुंटणखाना चालवित होती. तिच्याकडे वेश्या व्यवसाय करणाऱ्या अनेक महिला मुली आहेत. घरमालकाला संशय आल्याने त्यांनी तिला आपल्या घरातून हुसकावून लावले. दोन आठवड्यांपूर्वी तिने वाठोड्यात आठ हजार रुपये प्रतिमहिना किरायाने घर भाड्याने घेतले. तेथे ती वेश्या व्यवसाय चालवते, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांना मिळाली. त्यांनी लगेच कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवी नागोसे यांनी सोमवारी सायंकाळी सापळा रचला. अर्चना सोबत पोलिसांच्या पंटरने संपर्क साधला. दोन हजार रुपये दिल्यास अल्पवयीन मुली शरीरसंबंधासाठी उपलब्ध करून देण्याची तयारी अर्चनाने दाखवली. त्यानुसार ग्राहकाने तिला सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास रक्कम दिली. त्यानंतर अर्चनाने तीन अल्पवयीन तसेच एक तरुणी अशा चार वरांगणा ग्राहकांसमोर उभ्या केल्या. त्यातील एकीला ग्राहकाने रूम मध्ये नेले. ठरल्याप्रमाणे काही वेळातच तेथे पोलिसांनी छापा घातला. आरोपी अर्चना वैंशपायन हिला अटक करून वेश्याव्यवसाय करणाऱ्या त्या चौघींचे जबाब नोंदविण्यात आले. 

७५ टक्के लाटत होती अर्चना
प्राथमिक तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार, प्रति ग्राहक दोन हजार रुपये घेणारी अर्चना वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुलीच्या हातात पाचशे रुपये ठेवत होती.अर्थात, ७५ टक्के रक्कम ती स्वतः लाटत होती. दरम्यान, अर्चनाविरुद्ध पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी नागोसे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मंगला हरडे, हवालदार अनिल अंबाडे, नायक संदीप चांगोले, भूषण झाडे, अजय, चेतन, प्रतिमा आदींनी ही कारवाई केली.

प्राथमिक तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार, प्रति ग्राहक दोन हजार रुपये घेणारी अर्चना वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुलीच्या हातात पाचशे रुपये ठेवत होती. अर्थात, ७५ टक्के रक्कम ती स्वतः लाटत होती. दरम्यान, अर्चनाविरुद्ध पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी नागोसे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मंगला हरडे, हवालदार अनिल अंबाडे, नायक संदीप चांगोले, भूषण झाडे, अजय, चेतन, प्रतिमा आदींनी ही कारवाई केली.

Web Title: Four prostitutes found with three minor girls: Woman arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.