सात कोटींचा दंड भरल्यानंतर चौघांची सुटका, वणीतील कापूस व्यापाऱ्याचे ब्रोकर्सच्या नावे ६२१ कोटींचे बोगस ट्रेडिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2020 05:14 AM2020-12-20T05:14:26+5:302020-12-20T05:14:47+5:30

bogus trading : किशोर थेरे (जैन ले-आउट, वणी), रवी कुमरे (नवेगाव, पोलीस ठाणे, शिरपूर), विजय घुगुल (टागोर चौक, वणी) आणि विकास ढेंगळे (महादेवनगर, चिखलगाव, वणी) अशी या चार ब्रोकर्सची नावे आहेत.

Four released after paying Rs 7 crore fine, bogus trading of Rs 621 crore in the name of brokers | सात कोटींचा दंड भरल्यानंतर चौघांची सुटका, वणीतील कापूस व्यापाऱ्याचे ब्रोकर्सच्या नावे ६२१ कोटींचे बोगस ट्रेडिंग

सात कोटींचा दंड भरल्यानंतर चौघांची सुटका, वणीतील कापूस व्यापाऱ्याचे ब्रोकर्सच्या नावे ६२१ कोटींचे बोगस ट्रेडिंग

googlenewsNext

यवतमाळ : जिल्ह्याच्या वणी येथील कापसाच्या व्यापाऱ्याने मर्जीतील चार ब्रोकर्सच्या नावाने ६२१ कोटी ६० लाख रुपयांचे बोगस ट्रेडिंग केल्याचा खळबळनजक प्रकार नागपुरातील जीएसटी इंटेलिजन्सच्या पथकाने केेलेल्या कारवाईत उघडकीस आला. यात वणीतील त्या चार बोगस व्यापारी तथा ब्रोकर्सला शुक्रवारी १८ डिसेंबर रोजी सकाळी नागपुरात अटक करण्यात आली होती. त्यांनी प्रत्येकी पावणे दोन कोटींप्रमाणे एकूण सात कोटी रुपयांचा दंड भरल्यानंतर त्यांची जीएसटी इंटेलिजन्सने सुटका केली.
किशोर थेरे (जैन ले-आउट, वणी), रवी कुमरे (नवेगाव, पोलीस ठाणे, शिरपूर), विजय घुगुल (टागोर चौक, वणी) आणि विकास ढेंगळे (महादेवनगर, चिखलगाव, वणी) अशी या चार ब्रोकर्सची नावे आहेत. येथील शिवसेनेचे वणी विधानसभा मतदारसंघाचे संघटक सुनील कातकडे यांच्या साईकृपा जिनिंगमध्ये बोगस ट्रेडिंगचा हा प्रकार उघडकीस आला.
मंगळवारी जीएसटी इंटेलिजन्सच्या नागपुरातील पथकाने जिल्ह्यातील वणी येथे चार कॉटन व्यापाऱ्यांवर धाड टाकली. त्यांचे रेकॉर्ड तपासण्यात आले. तेव्हा मालाची प्रत्यक्ष देवाणघेवाण न करता केवळ बिलांची देवाणघेवाण (सर्क्युलर ट्रेडिंग) झाल्याचे निष्पन्न झाले. 

बोगस ट्रेडिंग उघड  
हा दंड चौघांनीही भरल्याने त्यांना जामीन मंजूर करून सुटका करण्यात आली. हे बोगस ट्रेडिंग उघड झाले. अशा पद्धतीने जिनिंग-प्रेसिंगमध्ये असा व्यवहार झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Four released after paying Rs 7 crore fine, bogus trading of Rs 621 crore in the name of brokers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.