कोईम्बतूर येथून इसिसशी संबंध असलेल्या संशयित चारजणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 07:43 PM2019-06-12T19:43:56+5:302019-06-12T19:45:03+5:30
इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून चारजणांना एनआयएने अटक केली आहे.
तामिळनाडू - श्रीलंकेत ‘इस्टर डे’ च्या दिवशी घडलेल्या बॅाम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणाने (एनआयए) आज तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे विविध ठिकाणी सकाळपासून छापेमारी केली. मिळालेल्या माहितीनुसार इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून चारजणांना एनआयएने अटक केली आहे.
श्रीलंकेत झालेल्या बॉम्ब हल्ल्याप्रकरणी एनआयएने तामिळनाडूतील तीन संशयितांच्या घरावर छापा टाकला आहे. आज सकाळी सहा वाजता कोच्चीहून एनआयएचे अधिकारी कोईम्बतूरला पोहोचले. त्यानंतर ठिकठिकाणी छापेमारी केली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएच्या अधिकाऱ्यांनी पोथनूरमध्ये अझरुद्दीन उक्कदम, सद्दाम, अकबर यांच्यासह कुणियामथूरमध्ये अबुबकर सिद्दीक आणि अल अमीम कॉलोनीत इधियाथुल्ला यांच्या घरावर छापा टाकला असून चौकशी सुरु आहे.
श्रीलंकेत झालेल्या बॉम्ब हल्ल्यानंतर भारत आणि श्रीलंकने पाच संशयितांचे फोन नंबर शेअर करण्यात आले होते. या संशयितांचा संबंध दहशतवादी संघटनेशी असल्याचे सांगण्यात येत आहे. भारताने सुद्धा काही अशा लोकांचे नंबर शेअर केले होते, जे श्रीलंकेतील दोन फिदायिनांच्या कुटुंबियांच्या संपर्कात होते. दरम्यान, एनआयएची टीम काही दिवसांपूर्वी आयएसच्या संशयितांची माहिती घेण्यासाठी श्रीलंकेला गेली होती. या माहितीच्या आधारावर एनआयएच्या अधिकाऱ्यांनी आज कोयंबत्तूरमध्ये छापेमारी केली असून यासंबंधी तपास सुरु केला आहे.
Tamil Nadu: Search operations that were underway in Coimbatore in connection with with ISIS module case have concluded. So far four persons have been arrested. pic.twitter.com/CYSfIDCCkZ
— ANI (@ANI) June 12, 2019