मुंबई अहमदाबाद महामार्गावर तेल माफियांची टोळी सक्रिय, चौघा चोरट्यांना रंगेहाथ पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 03:48 AM2018-09-26T03:48:30+5:302018-09-26T03:49:14+5:30
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील हलोली येथे तेल माफियांना टँकरमधून केमिकल चोरतांना पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
मनोर : मुंबई अहमदाबाद महामार्गावरील हलोली येथे तेल माफियांना टँकरमधून केमिकल चोरतांना पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे भंगार व तेल माफिया महामार्गावर पुन्हा सक्रिय झाले आहेत.
बदलापूरच्या आयडीयल केमिकल प्लास्ट या कंपनीतून मिक्स झायलिन हे रसायन घेऊन निघालेले दोन टँकर बोईसरच्या एमआयडीसी मधील सुकेतू आॅर्गेनिक्स या कारखान्यात मुंबई अहमदाबाद महामार्गावरून जात असतांना या चौघांनी संगनमत करून हलोली येथील बंद पडलेल्या पेट्रोलपंपावर ते थांबवले व त्याचे सील तोडून त्यामधील रसायन ते चोरतांना त्यांना पोलिसांनी पकडले.
मनोर पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार देवीलाल सुनजी पटेल, प्रकाश मुन्नाजी पटेल रा. पातूखेडा राज्यस्थान अर्जुन रामनरेश प्रसाद शिसवरी उतरप्रदेश , किशन सिंग परमार रा. वसई यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.