बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यात अडथळा ठरत होता मुलगा, आईनेच पोटच्या पोराची केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 12:07 PM2023-02-22T12:07:25+5:302023-02-22T12:07:51+5:30

Crime News : मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर जेव्हा लोकांनी त्याच्या आईला विचारणा केली तेव्हा महिला काहीच उत्तर देऊ शकली नाही. त्यानंतर लोकांनी तिला मारहाण सुरू केली.

Four year old boy killed by mother and mothers boyfriend in west Bengal | बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यात अडथळा ठरत होता मुलगा, आईनेच पोटच्या पोराची केली हत्या

बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यात अडथळा ठरत होता मुलगा, आईनेच पोटच्या पोराची केली हत्या

googlenewsNext

Crime News : पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगनामध्ये एका आईने प्रियकरासोबत मिळून आपल्या चार वर्षाच्या मुलाची हत्या केली. ही घटना कुंदखली गावातील आहे. मंगळवारी सायंकाळी स्थानिक लोकांना मुलाचा मृतदेह सापडला.

मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर जेव्हा लोकांनी त्याच्या आईला विचारणा केली तेव्हा महिला काहीच उत्तर देऊ शकली नाही. त्यानंतर लोकांनी तिला मारहाण सुरू केली आणि त्यानंतर तिने सांगितलं की, तिच्या प्रियकराने मुलाचा जीव घेतला. घटनेपासून तिचा प्रियकर फरार आहे.

स्थानिक लोकांनीच घटनेची सूचना पोलिसांना दिली आणि त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी आरोपी आईला अटक केली असून चौकशी सुरू आहे.

चौकशीतून समोर आलं की, आरोपी मफूजा पियादा 15 वर्षाआधी आपला पती अली पियादासोबत कोलकाता येथे आली होती. तिथे पती मजुरी करत होता. यादरम्यान मफूजा पियादाचे अबुल हुसैन शेख नावाच्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध सुरू झाले.

कधी कधी पती कामावर गेल्यावर अबुल हुसैन महिलेच्या घरी येत होता. पती घरी नसताना मंगळवारी तो महिलेच्या घरी गेला आणि दोघांनी दुसरीकडे जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे तिचा चार वर्षाचा मुलगा हैराण झाला. 

स्थानिक लोकांचा आरोप आहे की, मुलगा आपल्या आईशिवाय राहू शकत नव्हता. त्यामुळे महिलेने प्रियकरासोबत मिळून मुलाची हत्या केली. मुलाच्या शरीरावर जखमेच्या खुणा आहेत. जेव्हा याबाबत लोकांनी त्याच्या आईला विचारलं तर ती काही उत्तर देऊ शकली नाही. तेव्हा लोकांनी तिला मारहाण केली. 

Web Title: Four year old boy killed by mother and mothers boyfriend in west Bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.