बालविवाहानंतर चार वर्षांनी पत्नीने पतीवर केला बलात्काराचा आरोप, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 10:05 PM2021-05-18T22:05:00+5:302021-05-18T22:10:32+5:30
Child Marriage And Dowry Case : हुंडाबळीचा त्रास आणि बालविवाहाच्या संदर्भात कारवाई करत महिला पोलिस स्टेशनने मुलाच्या आई-वडिलांसह इतर दोन जणांना अटक केली
हांसी- हरियाणाच्या हांसीमध्ये बालविवाह, बलात्कार आणि हुंडयासाठी छळाचे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात वयाच्या १५ व्या वर्षी बालविवाहाचा बळी ठरलेल्या अल्पवयीन मुलीने तिच्या पतीवर तब्बल ४ वर्षांनी बलात्कार आणि हुंडा मागितल्याचा आरोप केला आहे. हुंडाबळीचा त्रास आणि बालविवाहाच्या संदर्भात कारवाई करत महिला पोलिस स्टेशनने मुलाच्या आई-वडिलांसह इतर दोन जणांना अटक केली.
सदर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत महिलेने सांगितले होते की, तिचे लग्न जींदच्या बेलराखा खेड्यातील तहसील नरवाना येथील रहिवासी युवकाशी २० डिसेंबर २०१७ रोजी झाले होते. तिचे लग्न झाले तेव्हा तिचे वय १५ होते. हे लग्न कैथल जिल्ह्यातील टिट्राट गावात राहणाऱ्या मामाने लावून दिले होते. या महिलेने असा आरोप केला होता की, तिच्या मामाने तिचे सुनीलशी लग्न लावून दिले तेव्हा तिच्या आई-वडिलांनी त्याला विरोध केला आणि सांगितले की, त्यांच्या मुलीचे वय लग्नाला योग्य नाही, मात्र तिच्या आईवडिलांवर दबाव आणत त्याने ते लग्न लावून दिले. नंतर तिच्या पतीच्या बहिणीचे मामाने स्वतः लग्न केले.
नेपाळी पोलिसांची भारतीय लोकांना मारहाण; तणावानंतर बॉर्डरवर SSB जवान तैनात, वाहतूक ठप्पhttps://t.co/MKxEunV5F6
— Lokmat (@MiLOKMAT) May 18, 2021
चुकीचे काम केल्याचा आरोप
या महिलेने सांगितले की, लग्नापासून १० दिवसांपर्यंत पतीने तिच्या इच्छेविरूद्ध तिच्यावर दुष्कर्म केले. त्यानंतर ती तिच्या घरी आली जेथे तिचे वय होईपर्यंत तिच्या कुटुंबीयांनी तिला सासरी परत पाठविण्यास नकार दिला. २० ऑगस्ट २०२० रोजी, ती प्रौढ झाल्यावर कुटुंबीयांनी तिला सासरच्या घरी पाठवले, पण तिच्या सासरच्यांनी हुंडा म्हणून मोटारसायकली आणि सोनसाखळ्यांची मागणी करण्यास सुरवात केली. तक्रारीत या महिलेने सांगितले की, तिच्या मामाने कट रचले होता आणि लहान वयातच तिचे लग्न केले होते.