बँकेचे खाते हॅक करून साडेचौदा कोटी लंपास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2021 06:10 AM2021-01-07T06:10:52+5:302021-01-07T06:11:19+5:30

Crime News: नवीन मोंढा भागातील शंकर नागरी सहकारी बँकेत अनेक व्यापारी, अडते यांची खाती आहेत. या बँकेचे वजिराबाद भागातील आयडीबीआय या बँकेत खाते आहे.

Fourteen and a half crore looted after hacked bank accounts | बँकेचे खाते हॅक करून साडेचौदा कोटी लंपास

बँकेचे खाते हॅक करून साडेचौदा कोटी लंपास

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
नांदेड : शहरातील शंकर नागरी सहकारी बँकेचे आयडीबीआय या बँकेत खाते आहे. आयडीबीआयमधील या खात्यातून हॅकर्सने एक महिन्याच्या काळात अंदाजे १४ कोटी ५० लाख रुपये काही व्यक्तींच्या खात्यावर वळते करून बँकेला चुना लावला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शंकर नागरी सहकारी बँकेने वजिराबाद पोलिसांना तक्रार देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. 


नवीन मोंढा भागातील शंकर नागरी सहकारी बँकेत अनेक व्यापारी, अडते यांची खाती आहेत. या बँकेचे वजिराबाद भागातील आयडीबीआय या बँकेत खाते आहे. या खात्यातून २ डिसेंबर २०२० ते ३ जानेवारी २०२१ या एक महिन्याच्या काळात अंदाजे १४ कोटी ५० लाख रुपये काही जणांच्या खात्यात वळते करण्यात आले आहेत. ही सर्व रक्कम एनईएफटी आणि आरटीजीएसद्वारे वळविली आहे. शंकर नागरी सहकारी बँकेने २ जानेवारी रोजी आपले खाते तपासल्यानंतर त्यांच्या लक्षात ही बाब आली. 


दरम्यान, या प्रकरणात तूर्त आयडीबीआय बँकेकडून मात्र कोणतेही स्पष्टीकरण आले नाही. या प्रकरणाचा तपास सायबर सेलकडून करण्यात येणार आहे.


खात्यातील रक्कम सुरक्षित
n शंकर नागरी सहकारी बँकेचे आयडीबीआय बँकेत असलेले खाते काही अज्ञात लोकांनी हॅक केले आहे. 
n ही जबाबदारी आयडीबीआय बँकेची आहे. तरी खातेदारांचे आणि ठेवीदारांचे पैसे सुरक्षित आहेत. 
n ग्राहकांनी काळजी करू नये, असे आवाहन बँकेचे चेअरमन माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम राजे यांनी केले आहे.

Web Title: Fourteen and a half crore looted after hacked bank accounts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.