चौदा तोळे चोरीला गेलेले, एकच तोळा परत करताय, असे का? तक्रारदाराचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 09:03 AM2022-01-01T09:03:00+5:302022-01-01T09:06:14+5:30

Mumbai : कांदिवलीच्या ठाकूर कॉम्प्लेक्स येथील तेरापंथ भवनात उत्तर प्रादेशिक विभागाकडून मालमत्ता तक्रारदारांना परत करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Fourteen weights stolen, why return only one weight? Complainant's question | चौदा तोळे चोरीला गेलेले, एकच तोळा परत करताय, असे का? तक्रारदाराचा सवाल

चौदा तोळे चोरीला गेलेले, एकच तोळा परत करताय, असे का? तक्रारदाराचा सवाल

Next

मुंबई: बारा वर्षांपूर्वी माझे चौदा तोळे सोने चोरीला गेले होते, आज तुम्ही एकच तोळे परत करताय, मी विचारू शकतो असे का, असा सवाल शुक्रवारी मुंबई पोलिसांचे सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील यांना मालमत्ता वाटपाच्या भर कार्यक्रमात नारायण केरकर (३०) नामक तक्रारदाराने केला. त्यावर आपली एफआयआर मी वाचला असून, त्याबाबत आपली मदत पोलीस नक्कीच करतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

कांदिवलीच्या ठाकूर कॉम्प्लेक्स येथील तेरापंथ भवनात उत्तर प्रादेशिक विभागाकडून मालमत्ता तक्रारदारांना परत करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सुरक्षारक्षक असलेले आणि कुरार पोलिसांच्या हद्दीत राहणारे केरकर तक्रारदार असलेली आई लक्ष्मी केरकर (६२) यांना घेऊन त्याठिकाणी आले होते. परिमंडळ १२ मधील मालमत्ता वाटप झाल्यानंतर कोणाला आपले मनोगत व्यक्त करायचे आहे का, असा सवाल सूत्रसंचालन करणारे पोलीस निरीक्षक रवी अडाणे यांनी केला. 

कसले श्रेय घेताय?
केरकर यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, २४ नोव्हेंबर २००९ रोजी त्यांची आई लक्ष्मी या काही कामानिमित्त १५ मिनिटांसाठी बाहेर गेल्या आणि तेवढ्या वेळात चोरांनी कपाट फोडत दागिने लंपास केले. माझी भावंडे आजारी पडली. वडील धक्क्याने गेले. नुकताच आईलादेखील हार्ट ॲटॅक येऊन गेला आहे. बऱ्याच खेपा टाकल्यानंतर मी पोलीस ठाण्यात जाणेच सोडून दिले. आरोपी स्थानिकच होते आणि त्यांनी पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुलीदेखील दिली होती. त्यानंतर आज जवळपास १२ वर्षांनंतर मला एक तोळे परत देऊन कसले श्रेय घेताय? अशी संतप्त प्रतिक्रियादेखील त्यांनी दिली.

प्रकरणाचा अभ्यास करू
केरकर यांनी मंचावर जाऊन ‘माझे २००९ मध्ये १४ तोळे सोने चोरीला गेले होते. तुम्ही आज मला फक्त एक तोळे सोने परत करीत आहात, जर परत करायचेच आहे तर एक तोळेच का, असा सवाल त्यांनी थेट मंचावर उपस्थित असलेल्या नांगरे पाटील यांना विचारला. 
ज्यावर आम्ही तुमच्याशी नंतर बोलतो असे अपर पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांनी त्यांना सांगितले. या विषयावर बोलताना केरकर यांचा एफआयआर मी वाचला आहे आणि आम्ही केरकरांच्या प्रकरणाचा अभ्यास करू’ असे आश्वासन नांगरे पाटील यांनी केरकर यांना देत त्यांची दखल घेतली. 

Web Title: Fourteen weights stolen, why return only one weight? Complainant's question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.