वर्ल्ड डेटिंग सर्व्हिसेसमध्ये मुलीबरोबर लिंक सांगून साडेसहा लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 03:12 PM2018-11-01T15:12:33+5:302018-11-01T15:16:55+5:30

तुमचे प्रोफाईल गोल्ड क्लब पोर्टलमध्ये वर्ल्ड डेटिंग सर्व्हिसेसमध्ये दिसत असून एका मुलीशी लिंक आहे़. त्यातून बाहेर पाडायचे असल्यास फी भरावी लागेल, असे सांगून.....

fraud of 26 lakhs with youthdue to told World dating services linking girls | वर्ल्ड डेटिंग सर्व्हिसेसमध्ये मुलीबरोबर लिंक सांगून साडेसहा लाखांचा गंडा

वर्ल्ड डेटिंग सर्व्हिसेसमध्ये मुलीबरोबर लिंक सांगून साडेसहा लाखांचा गंडा

Next
ठळक मुद्देवेगवेगळी कारणे सांगून त्यांना एकूण ६ लाख ५९ हजार ८०० रुपये लावले़ भरायला हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल

पुणे :तुमचे प्रोफाईल गोल्ड क्लब पोर्टलमध्ये वर्ल्ड डेटिंग सर्व्हिसेसमध्ये दिसत असून एका मुलीशी लिंक आहे़.त्यातून बाहेर पाडायचे असल्यास फी भरावी लागेल, असे सांगून एका तरुणाला साडेसहा लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़. हडपसरपोलिसांनी तिघा जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे़. 
याप्रकरणी धनंजय रामदास फरांदे (वय ३४, रा़. मांजरी) यांनी फिर्याद दिली आहे़. हा प्रकार ५ ते ११ सप्टेंबर २०१८ दरम्यान घडला़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, धनंजय फरांदे यांना एका टिना नाव सांगणाऱ्या तरुणीचा फोन आला़. तुमचे प्रोफाईल गोल्ड क्लब पोर्टलमध्ये वर्ल्ड डेटिंग सर्व्हिसेसमध्ये दिसत असून एका मुलीशी लिंक केले आहे, असे सांगून त्यांना घाबरविण्यात आले़. या पोर्टलमधून तुम्हाला बाहेर पडायचे असेल तर काही फी भरावी लागेल, असे सांगितले़. त्यानंतर अनिषा नाव सांगणाऱ्या दुसऱ्या तरुणीने त्यांना फोन करुन एका खात्यावर दीड हजार रुपये भरायला सांगितले़. त्यानुसार त्यांनी दीड हजार रुपये भरले़. त्यानंतर त्यांना पुन्हा फोन करुन ती तरुणी तुमच्या विरुद्ध तक्रार करेल, असे सांगून त्यांच्याकडून १५ हजार, २७ हजार, १० हजार रुपये भरायला सांगितले़. त्यानंतर आकाश शर्मा असे नाव सांगून आपण मॅनेजर असल्याचे त्यांना भासवले़. ती तरुणी इतक्या पैशावर राजी नसल्याचे सांगून आणखी घाबरविण्यात आले़ व वारंवार वेगवेगळी कारणे सांगून त्यांना एकूण ६ लाख ५९ हजार ८०० रुपये भरायला लावले़. 
त्याबाबत त्यांची चौकशी केल्यावर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले़. त्यानंतर त्यांनी सायबर क्राइमकडे तक्रार अर्ज केला होता़. त्यांच्या सूचनेनुसार हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़. 

Web Title: fraud of 26 lakhs with youthdue to told World dating services linking girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.