२० टन साखर दान करायची सांगून केली फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 19:49 IST2021-05-22T19:48:23+5:302021-05-22T19:49:02+5:30
Farud Case : तपासात तुषार बाबुभाई लुहार ह्यानेच स्वतःचे नाव दिनेश शाह सांगितल्याचे आढळून आले . त्याने मोहम्मद रईस रिफाकत हुसेन सय्यद च्या साथीने हा गुन्हा केला.

२० टन साखर दान करायची सांगून केली फसवणूक
मीरारोड - २० टन इतकी साखर दान करायची आहे असे सांगून खोट्या नावाने साखर घेऊन नंतर पैसे न देता फसवणूक करणाऱ्या एकास नवघर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे . तर खोटे नाव सांगणाऱ्याचा शोध सुरु आहे.
हरेश विठ्लानी यांच्या फिर्यादी वरून भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाण्यात गुरुवारी ६ लाख ५९ हजार रुपयांच्या साखर खरेदीत फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला होता. आरोपीने दिनेश बी. शाह असे नाव सांगून विठ्लानी यांच्या कडून २० टन साखर घेतली. साखर दान करायची सांगून त्याचे पैसे ६ लाख ५९ हजार रुपये इतके देतो सांगून फसवले. आरोपीने त्याचा मोबाईल बंद करून टाकला होता.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगेश काळे , उपनिरीक्षक संदीप ओहळ सह भालेराव , गिरगावकर , जाधव यांच्या पथकाने तपास सुरु केला. तपासात तुषार बाबुभाई लुहार ह्यानेच स्वतःचे नाव दिनेश शाह सांगितल्याचे आढळून आले . त्याने मोहम्मद रईस रिफाकत हुसेन सय्यद च्या साथीने हा गुन्हा केला.
पोलिसांनी रईस ला अटक केल्यावर त्याने फसवणूक करून मिळवलेली ४०० गोणी साखर नया नगरमधील अनमोल ट्रेडिंग कंपनीत ठेवल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी तेथून साखरेचा साठा जप्त केला आहे . तर दिनेश उर्फ तुषार चा पोलीस शोध घेत आहेत.