व्हीआयपी मोबाईल क्रमांकाच्या नावाखाली व्यावसायिकाची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 08:20 PM2019-03-28T20:20:34+5:302019-03-28T20:23:07+5:30

एका संदेशात 8800000000 व 9100000000 क्रमांक हवा असल्यास संपर्क साधण्यास सांगण्यात आले होते.

The fraud with a businessman under the name of a VIP mobile number | व्हीआयपी मोबाईल क्रमांकाच्या नावाखाली व्यावसायिकाची फसवणूक

व्हीआयपी मोबाईल क्रमांकाच्या नावाखाली व्यावसायिकाची फसवणूक

Next
ठळक मुद्देतक्रारदाराने याप्रकरणी बीकेसी पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार केली.आयपी क्रमांकासाठी एका बॅंक खात्यावर 41 हजार रुपये भरण्यास सांगितले.तक्रारदाराने तो दिल्यानंतर त्यावरही मोबाईल कंपनीच्या नावाने ई-मेल पाठवला.

मुंबई - व्हीआयपी मोबाईल क्रमांका देण्याचे आमीष दाखवून बांद्रे कुर्ला संकुल परिसरातील व्यावसायिकाला गंडा घातल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. आरोपींनी देशातील अग्रगण्य मोबाईल कंपनीच्या नावाने मोबाईल संदेश पाठवून तक्रारदाराचा विश्‍वास संपादन केला होता. 
व्हीआयपी क्रमांक पाठ करण्यात सोपे असल्यामुळे व्यवसायात त्याचा वापर होईल. तसेच "स्टाईल स्टेटमेंट' झाल्यामुळे अनेकजण असे क्रमांक मिळवण्यासाठी पाहिजे तेवढे पैसे देण्यास तयार होतात. तक्रादाराचा आठ मार्चला आलेल्या अशाच एका संदेशात 8800000000 व 9100000000 क्रमांक हवा असल्यास संपर्क साधण्यास सांगण्यात आले होते. त्यासाठी मोबाईल कंपनीच्या नावाचा व लोगोचाही वापर करण्यात आला होता. तक्रारदाराने त्या क्रमांकावर संपर्क साधला असता तेथील व्यक्तीने तक्रारदाराकडे ई-मेल आयडी मागितले. तक्रारदाराने तो दिल्यानंतर त्यावरही मोबाईल कंपनीच्या नावाने ई-मेल पाठवला. त्यात व्हीआयपी क्रमांकासाठी एका बॅंक खात्यावर 41 हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदाराने 41 हजार रुपये भरल्यानंतर त्याला पावती आली. ती पावती घेऊन मोबाईल गॅलरीत जाणास सांगण्यात आले. दुस-या दिवशी तक्रारदार तेथे गेला असता ती पावती खोटी असून त्याची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार तक्रारदाराने याप्रकरणी बीकेसी पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार केली.

Web Title: The fraud with a businessman under the name of a VIP mobile number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.