साहित्य खरेदीच्या नावाने बँकेतून २९ लाख रुपये कर्ज काढून फसवणूक; तिघांना अटक

By नितिन गव्हाळे | Published: December 14, 2023 06:54 PM2023-12-14T18:54:49+5:302023-12-14T18:54:58+5:30

१३ कर्जदारांविरुद्ध गुन्हा दाखल

Fraud by taking a loan of Rs. 29 lakhs from the bank in the name of purchasing materials; Three arrested | साहित्य खरेदीच्या नावाने बँकेतून २९ लाख रुपये कर्ज काढून फसवणूक; तिघांना अटक

साहित्य खरेदीच्या नावाने बँकेतून २९ लाख रुपये कर्ज काढून फसवणूक; तिघांना अटक

नितीन गव्हाळे, अकोला : साहित्य खरेदीच्या नावाने बँकेतून सुमारे २९ लाख रुपयांचे कर्ज काढल्यानंतर साहित्याची खरेदी न करता, कर्जाचा भरणा न करून बँकेची फसवणूक करणाऱ्या १३ कर्जदारांविरुद्ध रामदास पेठ पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यातील तिघा आरोपींना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात २९ लाखाने बँकेची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. आरोपींना न्यायालयाने १७ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

‘एचडीएफसी’ बँकेचे नागपूर शाखेचे महाव्यवस्थापक पंकज ओरेकर यांच्या तक्रारीत, त्यांनी अकोला येथील १३ जणांनी बँकेची फसवणूक केल्याची रामदासपेठ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. या तक्रारीनुसार बँकेमध्ये खाते उघडल्यानंतर त्यांना बँकेद्वारे डेबिट कार्ड इश्यू करण्यात आले. त्यांना मिळालेल्या ऑफरनुसार साहित्य खरेदी करण्याकरिता कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. साहित्य खरेदी केल्यानंतर त्याची रीतसर पावती बँकेत जमा करणे गरजेचे असताना या कर्जदारांनी एजंटच्या मदतीने साहित्य खरेदी न करता पैसे विड्रॉल केले. त्यामध्ये बँकेची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करीत १३ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

त्यानुसार रामदासपेठ पोलिसांनी तपास सुरू बाळापूर येथील सना कॉम्प्युटर, अकोला येथील मनकर्णा प्लॉटमधील रहिवाशी राज मो. उस्मान चौधरी, नायगाव परिसरातील शारीक उर्फ शाहरूख जिसबिल शाह या तीन आरोपींना अटक केली. पुढील तपास रामदासपेठचे ठाणेदार मनोज बहुरे करीत आहेत.

Web Title: Fraud by taking a loan of Rs. 29 lakhs from the bank in the name of purchasing materials; Three arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.