सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणी 'ईगल'वर फसवणुकीचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 01:46 PM2020-06-29T13:46:26+5:302020-06-29T13:50:12+5:30
वजीराबाद ठाण्यात गुन्हा दाखल : नामांकित कंपन्यांच्या बियाणांची उगवण क्षमता २५ टक्केच
श्रीनिवास भोसले
नांदेड - बोगस सोयाबीन विक्री केल्यामुळे शेकडो हेक्टरवर उगवून होऊ न शकल्याने करोडो रुपयांचे नुकसान शेतकर्यांना सहन करावे लागले. सदर प्रकरण लोकमतने लावून धरल्यानंतर इंदौर येथील एका सोयाबीन कंपनीवर वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
यंदा पाऊस चांगला झाल्याने शेतकर्यांनी मृगनक्षत्रात खरिपाची पेरणी केली. मात्र ज्या शेतकर्यांनी सोयाबीनचे बियाणे खरेदी करून लागवड केली. अशा अनेक शेतकर्यांचे बियाणे उगवले नाही. अशा शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. बोगस बियाणे बाजारात आणून विक्री करणारे व्यापारी व संबंधित कंपनीवर गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी शेतकर्यांसह विविध संघटनांनी केली होती. दरम्यान, सदर प्रकरण 'लोकमत'ने लावून धरल्यानंतर उच्च न्यायालयाने सदर कंपन्या आणि विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तसेच स्वतःहून न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली होती. दरम्यान नांदेडात दाखल करण्यात आलेला हा राज्यातील पहिलाच गुन्हा असल्याचे बोलले जात आहे. सोयाबीन बियाणे उत्पादन करणाऱ्या या इंदौरमधील नामांकित कंपनीचे बियाणे 25% उगवण क्षमता असलेले बीज परीक्षण प्रयोगशाळा परभणी यांच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. बियाणांची उगवण क्षमता 70टक्के असणे गरजेचे असते. दरम्यान, या संदर्भात जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संतोष नादरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वजीराबाद ठाण्यात सदर कंपनी विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीत उच्च न्यायालयाने दाखल करून घेतलेल्या सुमोटो याचिकेचाही संदर्भ देण्यात आला आहे.
या प्रकरणाची दखल घेत कृषी सहनियंत्रण समितीच्या रविवारी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी तक्रारी प्राप्त कंपनीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार वजिराबाद पोलिस ठाण्यात इंदौर येथील इगल सीड अॅण्ड बायोटेक लिमिटेड कंपनीवर गुन्हा करण्यात आला आहे. एखाद्या कंपनीवर बोगस बियाणे विक्री प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची या वर्षांमधील पहिलीच कारवाई आहे. दरम्यान जिल्ह्यातील बियाणे न उगवलेल्या शेतकऱ्यांच्या लेखी तक्रारींची संख्या चार हजारावर पोहोचली आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
५ प्रेमविवाहानंतर पतीचा दुर्दैवी अंत; पहिल्या पत्नीनेच १ कोटींची सुपारी देऊन काढला काटा
लग्न सोहळ्यात वादग्रस्त हळदी समारंभामुळे आले विघ्न, तिघांवर गुन्हा दाखल
हृदयद्रावक! बंद फ्लॅटमध्ये दाम्पत्याची आत्महत्या; पोलिसांनी दरवाजा उघडताच ८ महिन्यांचे बाळ दिसले रांगताना
बापरे! आई आणि मुलाच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून सावत्र बापाने केली मुलाची हत्या
भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला