सॅनिटायझरचे काम सांगून साडेपाच लाखांना गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 10:39 AM2021-12-18T10:39:00+5:302021-12-18T10:39:25+5:30

वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे.  

Fraud of Five and a half lakhs worth of givng sanitizers work | सॅनिटायझरचे काम सांगून साडेपाच लाखांना गंडा

सॅनिटायझरचे काम सांगून साडेपाच लाखांना गंडा

Next

ठाणे : चंद्रपूरमध्ये घरोघरी देण्यासाठी सॅनिटायझरचे काम मिळवून देण्याच्या नावाखाली दीपक क्षीरसागर (२८, रा. बल्लारपूर, चंद्रपूर) यांची साडेपाच लाखांची फसवणूक करणाऱ्या सुनील गायकवाड याच्याविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे.  

शिवाईनगर येथील रहिवासी गायकवाड याने रामेश्वर पेचे यांना जिओ फायबरच्या कामासंदर्भात ऑगस्ट २०२० मध्ये ठाणे येथील त्यांच्या घरी भेटण्यासाठी बोलविले होते. लक्ष्मी बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचे मालक सुनील गायकवाड याने चंद्रपूर जिल्ह्यात घरोघरी सॅनिटायझरचे काम मिळवून देतो,  असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर याच कामासाठी सुरक्षा अनामत म्हणून पाच लाख ५० हजार रुपये घेऊन, तसेच कामासंदर्भात एसबीटीए बिझनेस जंक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नावाची बनावट कागदपत्रे बनवून आरोही ट्रेडर्स या कंपनीशी करार केला.

  • कामासाठी दिलेले २१ लाख आणि  मोबादला दहा लाख अशी ३६ लाख ५० हजाराचा परतावा न करता अपहार करून फसवणूक केल्याचाही आरोप आहे. 
  • हा प्रकार २२ ऑगस्ट ते ४ ऑक्टोबर दरम्यान घडला. क्षीरसागर यांनी याप्रकरणी १६ डिसेंबर २०२१ रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 

Web Title: Fraud of Five and a half lakhs worth of givng sanitizers work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.