सावधान! वर्क फ्रॉम होमचं आमीष; 'Amazon'मध्ये नोकरी लावण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 11:13 AM2022-12-06T11:13:45+5:302022-12-06T11:13:51+5:30
Amazon मध्ये नोकरी लावण्याच्या नावाखाली अनेक तरुणांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. यात अनेक तरुणांकडून लाखो रुपये घेतल्याचे समोर आले आहे.
Amazon मध्ये नोकरी लावण्याच्या नावाखाली अनेक तरुणांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. यात अनेक तरुणांकडून लाखो रुपये घेतल्याचे समोर आले आहे. यातील मुख्य आरोपीने स्वत: अॅमेझॉनचा कार्यकारी सहाय्यक असल्याचे सांगितले आहे. बनावट कॉल सेंटर चालवून त्याने अनेकांची फसणूक केली आहे. मुख्य सूत्रधार दुबईतून टोळी चालवत आहे. याप्रकरणी पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली आहे.
हे प्रकरण उत्तर दिल्लीतील आहे. गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार सायबर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. यात बनावट वेबसाइट तयार करून अनेकांची फसवणूक केली जात असल्याचे उघड झाले आहे. आरोपींनी बनावट कॉल सेंटरही सुरू केले आहे. ही माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून अमित केडिया, सचिन गुप्ता, रोहित जैन आणि प्रदीप कुमार या चार आरोपींना अटक केली.
ज्या तरूणीच्या हत्येसाठी 7 वर्षांपासून तुरूंगात बंद आहे तरूण, ती आता सापडली जिवंत
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरोपींनी amazon.com ची बनावट वेबसाइट आणि लिंक तयार केली होती. या लिंकमध्ये व्हर्च्युअल वॉलेट देखील होते. त्यांनी तयार केलेली बनावट वेबसाइट हुबेहूब खऱ्या वेबसाइटसारखी दिसते. अॅमेझॉन कंपनीत घरून काम दिले जात असल्याचे आरोपीने तरुणांना सांगितले होते. यातून तो तरुणांकडून पैसे घेत असायचा. अशा पद्धतीने त्याने शेकडो तरुणांच्या खात्यात पैसे जमा केले.
या प्रकरणाचे कनेक्शन दुबईशीही जोडलेले आहे. आरोपींनी दिल्लीतील अशोक विहारमध्ये बनावट कॉल सेंटर उघडले होते. या कॉल सेंटरवरून तरुणांना फोन करून क्रिकेट बेटिंग अॅप डाउनलोड करण्यास सांगितले जात होते. ते दुबईहूनही चालवले जात होते. पोलिसांनी या छाप्यात आरोपींकडून हजारो रुपये रोख, डझनभर मोबाईल फोन, 22 सिमकार्ड आणि बनावट आयात-निर्यात प्रमाणपत्रे जप्त केली आहेत. पोलिसांना आरोपींच्या 17 बँक खात्यांचा तपशील मिळाला आहे.