ऑनलाईन नोकरी शोधणाऱ्या महिलेची फसवणूक

By धीरज परब | Published: March 27, 2023 05:00 PM2023-03-27T17:00:05+5:302023-03-27T17:00:21+5:30

नफ्याच्या आमिषाने स्वप्नाली यांनी १ लाख ८१  हजार भरले व टास्क पूर्ण केल्याने नफा म्हणून ३७ हजार ६७४ रुपये परत मिळाले.

Fraud of a woman looking for an online job in mira road | ऑनलाईन नोकरी शोधणाऱ्या महिलेची फसवणूक

ऑनलाईन नोकरी शोधणाऱ्या महिलेची फसवणूक

googlenewsNext

मीरारोड - मीरारोडच्या शांती नगरमध्ये राहणाऱ्या स्वप्नाली कुमारनंदन या ऑनलाईन नोकरी शोधत असताना टास्क करून नफा देण्याच्या बहाण्याने त्यांची फसवणूक करण्यात आली. 

स्वप्नाली इंटरनेटवर नोकरी शोधत असताना टॅलेंट प्रो कंपनी नावाने टास्क पूर्ण करून घरबसल्या २ ते ३ हजार रुपये रोज कमवू शकता असा संदेश सह एक लिंक पाठवण्यात आली.  लिंक द्वारे त्यांनी टास्क पूर्ण केला असता त्यांना २१० रुपये मिळाले.  त्यांनी संबंधित समी नावाच्या महिलेस संपर्क केला असता रोज २५ टास्क पूर्ण केले तर २ हजार ७७७ रुपये मिळतील . पुढील टास्क पूर्ण करायचे असतील तर तुम्हाला पैसे भरावे लागतील असे समी हिने सांगितले. 

नफ्याच्या आमिषाने स्वप्नाली यांनी १ लाख ८१  हजार भरले व टास्क पूर्ण केल्याने नफा म्हणून ३७ हजार ६७४ रुपये परत मिळाले. नंतर मात्र पैसे न मिळाल्याने अन्य काहीजणां कडे चौकशी केली असता त्यांची देखील फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. नया नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर समी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

Web Title: Fraud of a woman looking for an online job in mira road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.