करणी केल्याचे सांगून मृत्यूची भीती दाखवून सव्वासात लाखांची फसवणूक; पिंपरीतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2022 10:16 AM2022-02-06T10:16:18+5:302022-02-06T10:16:27+5:30

किमदेवांशी सोलंकी (रा. उद्योगनगर, चिंचवड), असे गुन्हे दाखल करण्यात आलेल्या ज्योतिष महिलेचे नाव आहे.

Fraud of lakhs in by showing fear of death by saying deeds; Incident in Pimpri | करणी केल्याचे सांगून मृत्यूची भीती दाखवून सव्वासात लाखांची फसवणूक; पिंपरीतील घटना

करणी केल्याचे सांगून मृत्यूची भीती दाखवून सव्वासात लाखांची फसवणूक; पिंपरीतील घटना

Next

पिंपरी : कोणीतरी करणी केली असून, गुप्त व अघोरी पूजा करावी लागेल अन्यथा मृत्यू होईल, अशी भीती दाखवून एकाकडून सात लाख २१ हजार ४९१ रुपये घेतले. याप्रकरणी एका ज्योतिष महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उद्योगनगर, चिंचवड येथे नोव्हेंबर २०२१ ते ८ जानेवारी २०२२ या कालावधीत फसवणुकीचा हा प्रकार घडला. 

किमदेवांशी सोलंकी (रा. उद्योगनगर, चिंचवड), असे गुन्हे दाखल करण्यात आलेल्या ज्योतिष महिलेचे नाव आहे. याप्रकरणी एका ५२ वर्षीय व्यक्तीने शनिवारी (दि. ५) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या घरच्यांना होणारा मानसिक त्रास कमी होण्यासाठी आरोपी ज्योतिष महिलेने अघोरी पूजा करण्याचे सांगितले. कोणीतरी एकाने फिर्यादी व त्यांच्या घरच्यांवर करणी केली आहे. फिर्यादीवर जास्त मोठ्या प्रमाणात करणी केली असल्याने गुप्त व अघोरी पूजा करावी लागेल. अघोरी पूजा नाही केली तर मृत्यू होईल, अशी भीती आरोपी ज्योतीष महिलेने दाखविली. फिर्यादीकडून वेळोवेळी सात लाख २१ हजार ४९१ रुपये बँकेच्या खात्यावर ऑनलाईन तसेच रोख स्वरूपात घेतले. 

फिर्यादीने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार भादंवि कलम ४२०, ३८७, तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व समूळ उच्चाटन करण्याबाबतचे अधिनियम २०१३ घ्या कलम ३ अन्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक भारत वारे तपास करीत आहेत.

Web Title: Fraud of lakhs in by showing fear of death by saying deeds; Incident in Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.