बिटकॉईनमध्ये गुंतवणूकच्या बहाण्याने सव्वा पाच लाखांची फसवणूक 

By धीरज परब | Published: April 18, 2023 08:05 PM2023-04-18T20:05:52+5:302023-04-18T20:06:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क  मीरारोड -  इंस्टाग्राम वर अनोळखी व्यक्तीने बिटकॉइन मध्ये चांगला फायदा करून देण्याचे आमिष दाखवून भाईंदरच्या व्यक्तीस ...

Fraud of Rs. 500,000 on the pretext of investment in Bitcoin | बिटकॉईनमध्ये गुंतवणूकच्या बहाण्याने सव्वा पाच लाखांची फसवणूक 

बिटकॉईनमध्ये गुंतवणूकच्या बहाण्याने सव्वा पाच लाखांची फसवणूक 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड -  इंस्टाग्राम वर अनोळखी व्यक्तीने बिटकॉइन मध्ये चांगला फायदा करून देण्याचे आमिष दाखवून भाईंदरच्या व्यक्तीस सव्वा पाच लाखांना ऑनलाईन गंडवल्याची घटना घडली आहे. 

उत्तन भागात राहणार ललीत रमेश चव्हाण (३५ ) यांना त्यांच्या इंस्टाग्राम वर स्वतःला अमेरिकेत रहात असल्याचे सांगणाऱ्या वेनडी नावाच्या अनोळखी व्यक्तीने संदेश पाठवला . बिटकॉइन मध्ये ४० हजार भरले कि ३ लाख ९० मिळतील असे आमिष दाखवले. 

ललित यांनी पैश्यांच्या लोभाने त्या अनोळखी व्यक्ती सोबत चॅटिंग सुरु केले . ट्रेडिंग खाते उघडून त्यात ४० हजार भरले . सुरवातीला खात्यात ४ लाख ९ हजार दिसले मात्र ते काढण्याचा प्रयत्न करून देखील शक्य झाले नाही . पैसे काढण्यासाठी संकेतस्थळावर ट्रेडींग खाते रजिस्टर तसेच अपग्रेड करण्यासाठी ललित यांनी वेगवेगळ्या बँक खात्यावर ५ लाख २० हजार रुपये भरले . मात्र त्या नंतर सुद्धा फायद्याचे सांगितलेले तर सोडाच गुंतवलेले पैसे देखील परत न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे ललित यांना लक्षात आले . त्यांच्या फिर्यादी वरून उत्तन सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

Web Title: Fraud of Rs. 500,000 on the pretext of investment in Bitcoin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.