'रिमोट डेस्क'चा वापर करून ज्येष्ठ महिलेची ७१ हजारांची फसवणूक

By भाग्यश्री गिलडा | Published: July 15, 2023 06:13 PM2023-07-15T18:13:05+5:302023-07-15T18:13:21+5:30

खासगी माहितीचा वापर करून परस्पर ट्रान्सफर करून घेतले पैसे

Fraud of Rupees 71 thousand using remote desk to rob senior citizen woman | 'रिमोट डेस्क'चा वापर करून ज्येष्ठ महिलेची ७१ हजारांची फसवणूक

'रिमोट डेस्क'चा वापर करून ज्येष्ठ महिलेची ७१ हजारांची फसवणूक

googlenewsNext

भाग्यश्री गिलडा, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: सोशल मीडियावर असलेल्या अँपवरून ऑर्डर केली असता रिमोट डेस्कचा वापर करून ज्येष्ठ महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार कर्वेनगर परिसरात घडला आहे.

एका ८२ वर्षीय महिलेने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, महिलेने बिग बास्केटवरून ऑर्डर केली होती. महिलेला अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला आणि बिग बास्केटमधून बोलत असल्याचे सांगून महिलेचा विश्वास संपादन केला. तुमचा पत्ता विचारायचा आहे आणि काहीतरी सांगून त्यांना मोबाईलमध्ये रिमोट डेस्क इन्स्टॉल करायला सांगितले. अशा पद्धतीने मोबाईलचा रिमोट ऍक्सेस मिळवून खासगी माहितीचा वापर करून परस्पर ७१ हजार ९०० रुपये ट्रान्सफर करून घेतले.

महिलेने तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल क्रमांक धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अज्ञात मोबाईल क्रमांकावरून फोन आल्यास कुठलीही लिंक क्लिक करण्याआधी त्याची शहानिशा करण्याची गरज आह. अज्ञाताच्या सांगण्यावरून रिमोट ऍक्सेस देणे धोक्याचे ठरू शकते त्यामुळे नागरिकांनी सजग राहून ऑनलाईन व्यवहार तसेच शोधलं मीडियाचा वापर केला पाहिजे.  -संगीता पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक, अलंकार पोलीस ठाणे

Web Title: Fraud of Rupees 71 thousand using remote desk to rob senior citizen woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.