घर भाड्याने घेण्याच्या बहाण्याने सैन्य दलाचा अधिकारी सांगून ऑनलाईन गंडवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2021 09:51 PM2021-12-05T21:51:41+5:302021-12-05T21:51:48+5:30
घर भाड्याने देण्यासाठी जाहिरात दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - घर भाड्याने द्यायचे असल्याच्या जाहिराती वरून संपर्क साधत आपण सैन्यदलात अधिकारी आहे सांगत एका भामट्याने ओनलाईन वर ५३ हजार रुपयांना गंडवल्या प्रकरणी मीरारोडच्या नया नगर पोलीस ठाण्यात २ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
अदबा हारुन शेख रा . सिता पार्क, नयानगर, मिरारोड यांची आत्या नसीम खान रा. मगदुम शहा दर्गा जवळ, माहिम यांचा वांद्रे येथील लकी विला, पेरी रोड, नवी कांतवाडी येथे फ्लॅट आहे . तो भाड्याने देण्यासाठी जाहिरात दे असे आत्याने सांगितल्याने अदबा यांनी एका संकेतस्थळावर जाहिरात दिली होती . त्याच दिवशी सैन्य दलात अधिकारी आहे असे सांगणाऱ्या अमित कुमार नावाच्या अनोळखी इसमाने अदबा यांना फोन केला व घर भाड्याने घ्यायचे आहे सांगितले . ५० हजार अनामत रक्कम ऑनलाईन ट्रान्स्फर करतो सांगून अमित याने पेटीएम नंबर मागितला . अदबा यांनी त्यांची वांद्रे येथील दुसरी आत्या यास्मीन अखलाक हुसेन यांचा नंबर दिला . अमितने १० रुपये यास्मीनच्या खात्यावर पाठविले.नंतर अमित ने यास्मिन ला फोन करून, मला सैन्य दलात सर्व ट्रान्झेक्शन दाखवावे लागते सांगून ते १० रुपये परत पाठवा मी तुम्हाला अनामत रकमेचे सर्व पैसे पाठवतो सांगितले . त्यावर तिने पैसे परत पाठवले.
नंतर त्याने मला ४० हजार रुपये पाठवा मी तुम्हाला ५० हजार पाठवतो असे सांगितले असता यास्मिनने ४ हजार पाठवले . नंतर त्याने अदबा हिला कॉल करून तुमचे सर्व पैसे गुगल पेमेदेतो हू,असे म्हणाला असता, मीत्यास माझा गुगल पे वर देतो, पण तुम्ही आधी २० हजार पाठवा सांगितले . तिने २० हजार पाठवले असता त्याने पुन्हा री पे करा सांगितल्यावर तिने री पे करताच आणखी २० हजार गेले . आपले पैसे परत करा सांगितले असता त्याने तिला क्यूआर कोड पाठवून स्कॅन करायला सांगितलं व आणखी ९ हजार रुपये घेतले . अश्या रीतीने ५३ हजार रुपयांना गंडवल्या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन पोलीस आता तपास करत आहेत . नागरिकांनी जागरूक व सावध राहून ऑनलाईन पैश्यांचे व्यववहार करावे . भूलथापांना बळी पडू नये आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र व्हनकोटी यांनी केले आहे .