पुण्यातील सराफाची २ कोटी २० लाखांची फसवणूक; कोल्हापूरहून एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 11:18 PM2020-10-10T23:18:38+5:302020-10-10T23:23:16+5:30

२ कोटी २० लाख रुपयांचे दागिने घेऊन कोल्हापूर, सांगली परिसात सराफांना दागिन्यांची विक्री करतात..

Fraud of Rs 2 crore and 20 lakhs of Jewellery businessman ; One arrested from Kolhapur | पुण्यातील सराफाची २ कोटी २० लाखांची फसवणूक; कोल्हापूरहून एकाला अटक

पुण्यातील सराफाची २ कोटी २० लाखांची फसवणूक; कोल्हापूरहून एकाला अटक

Next

पुणे : सराफ व्यावसायिकाकडून विक्रीसाठी घेतलेले २ कोटी २० लाख रुपयांचे दागिने घेऊन त्याचा अपहार केल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी एकाला कोल्हापूरातून अटक केली आहे. आनंद सुरेश गुंदेशा (वय ४२, रा. प्रार्थना अपार्टमेंट, भक्तीपुजानगर, कोल्हापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
      याप्रकरणी सराफ व्यावसायिक देबू मजुमदार (वय ४८, रा. सोमवार पेठ) यांनी फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. मुजुमदार याचे बुधवार पेठेत सराफी दुकान आहे. ते कमी कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांची (टेंपल ज्वेलरी) विक्री करतात. गुंदेशा हे त्यांच्याकडून दागिने घेऊन कोल्हापूर, सांगली परिसात सराफांना दागिन्यांची विक्री करतात. या व्यवहारात मजुमदार गुंदेशा यांनी कमिशन देत असत. गुंदेशा यांनी जानेवारी महिन्यात मजुमदार यांच्याकडून दागिने घेतले. त्यापैकी काही दागिन्यांची विक्री केली.

उर्वरित २ कोटी २० लाख रुपयांचे ५ किलो ८९ गॅम वजनाचे दागिने परत केले नाही. दरम्यान, लॉकडाऊन सुरु झाला. त्यामुळे मजुमदार यांनी गुंदेशाकडे चौकशी केली नाही. अनलॉक सुरु झाल्यानंतर मजुमदार यांनी गुंदेशाकडे पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. गुंदेशांनी दागिने परत न केल्याने त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक यशपाल सूर्यवंशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुंदेशा यांना कोल्हापूरतून अटक केली. गुंदेशाने आणखी काही सराफ व्यावसायिकांची फसवणूक केली असण्याची शक्यता आहे. न्यायालयाने अधिक तपासासाठी गुंदेशाला ४ दिवसांची पोलीस कोठडी मंजुर केली आहे. 

Web Title: Fraud of Rs 2 crore and 20 lakhs of Jewellery businessman ; One arrested from Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.