मामा भाच्याला गंडवले, डिलरशिप मिळवून देण्याच्या बहाण्याने तब्बल ८५ लाखांची फसवणूक 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 03:57 PM2020-07-21T15:57:54+5:302020-07-21T16:03:29+5:30

खारघरमधील धक्कादायक घटना  

Fraud of Rs 85 lakh under the pretext of getting dealership | मामा भाच्याला गंडवले, डिलरशिप मिळवून देण्याच्या बहाण्याने तब्बल ८५ लाखांची फसवणूक 

मामा भाच्याला गंडवले, डिलरशिप मिळवून देण्याच्या बहाण्याने तब्बल ८५ लाखांची फसवणूक 

Next
ठळक मुद्दे या प्रकरणात फसवणूक झालेल्या मामा भाच्याचे नाव नंदकुमार द्विवेदी आणि राजेश दवे असे आहे.कंपनीने त्यांना नवी मुंबईचे डिस्ट्रीब्युटरशिप देण्याचे आश्वासन दिल्याने या दोघांनी सदर व्यवसाय सुरु करण्यासाठी आरव एंटरप्रायझेस् नावाची कंपनी सुरु केली.  

पनवेल : खारघरमध्ये राहणाऱ्या मामा भाच्याला पॅनासोनिक कंपनीचे सोलारवर चालणारे एसी विक्रीचे डिलरशिप मिळवून देण्याचा बहाणा करून  मामा व त्याच्या भाच्याला ८५ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात टोळीविरोधात फसवणुकिचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस शोध घेत आहे.

     

या प्रकरणात फसवणूक झालेल्या मामा भाच्याचे नाव नंदकुमार द्विवेदी आणि राजेश दवे असे आहे. खारघरमध्ये राहणारे मामा भाचा हे बिल्डींग मटेरियअल सफ्लायचा व रिअल इस्टेटचा व्यवसाय करतात. फेब्रुवारी 2017 मध्ये या प्रकरणातील टोळीने एका इंग्रजी वर्तमानपत्रात इ.एस .आर.एनर्जी सेल्फ रिलायन्स प्रा.लि या कंपनीच्या वतीने सोलर पॉवर टोटल सोल्युशनचे डिस्ट्रीब्युटर्स नेमण्यात येत असल्याची जाहीरात प्रसिध्द केली होती. सदर जाहीरातीमध्ये सोलर किट शुन्य टक्के व्याजाने देण्याचे व त्यामुळे विज बिल शुन्य टक्के येईल तसेच त्याचा फायदा पर्यावरणास होणार असल्याची माहिती सुद्धा दिली होती. ही जाहीरात पाहुन सदर कंपनीच्या माध्यमातुन भागीदारीत व्यवसाय सुरु करण्याचा मामा व त्याच्या भाच्याने निर्णय घेतला व सदर कंपनीसोबत बोलणी सुरु केली. त्यावेळी कंपनीने त्यांना नवी मुंबईचे डिस्ट्रीब्युटरशिप देण्याचे आश्वासन दिल्याने या दोघांनी सदर व्यवसाय सुरु करण्यासाठी आरव एंटरप्रायझेस् नावाची कंपनी सुरु केली.  

 

या दोघांनी सदर कंपनीमध्ये संपर्क साधल्यानंतर हसिम इब्राहीम याने भारतामध्ये सोलरवर चालणारा पहिला (एसी) किट हे त्याने स्वत: बनविल्याचे व त्याबाबत त्याने पॅनासोनिक कंपनीसोबत करार केल्याचे सांगितले. तसेच पॅनासोनिक कंपनीने भारतामध्ये डिस्ट्रीब्युटर नेमण्याचे सर्व हक्क त्यांच्या कंपनीला दिल्याचे सांगितले. त्यानंतर इब्राहीम याने त्यांना नवी मुंबई,खोपोली, रायगड या भागाचा सी.एन.एफ. एजंट म्हणून नेमण्याचे आश्वासन दिले. तसेच सदर एजंटशिप दिल्यानंतर त्यांना सात टक्के कमिशन मिळेल असे सांगून त्यांना 40 लाख रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर या दोघांनी इब्राहीम याच्या कंपनी सोबत करारनामा करुन घेतल्यानंतर त्यांनी 15 लाख रुपये रोख व 5 लाख रुपये आर.टी.जी.एस.द्वारे इब्राहिम याला दिले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पॅनासोनिक कंपनीचा सोलरवर चालणारा वातानुकुलित (एसी) विकण्यासाठी नवी मुंबईचा डिस्ट्रीब्युटर म्हणून आरव इंटरप्रायजेस यांना नेमण्यात आल्याची जाहिरात इंग्रजी वृत्तपत्रामध्ये प्रसिध्द केली. त्यामुळे या दोघांचा हसीम इब्राहीम याच्यावर बसल्यानंतर त्यांनी आणखी 15 लाख रुपयांची रक्कम आर टी जी एसद्वारे या टोळीला दिली.  त्यानंतर इब्राहिम याने या मामा भाच्याला गोवा राज्याची डिरलशिप घेण्यासाठी आणखी 45 लाख रुपये भरावे लागतील असे सांगुन त्यांना आणखी 45 लाख रुपये भरण्यास भाग पाडले. त्याबाबतची जाहिरात देखील त्यांनी प्रसिद्ध केली. त्यानंतर या दोघांनी आणखी 25-25 लाख रुपयांची रक्कम आर टी जी एस द्वारे हसीम इब्राहीम याला दिली. अशा पद्धतीने या मामा भाच्यांनी सदर टोळीला एकुण 85 लाख रुपये दिल्यानंतर हसीम इब्राहीम, इब्राहीम खादर व झिनथ आरीफ मुन्शी यांनी मामा भाच्याला 10 दिवसांत माल पाठविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर या दोघांनी मालासाठी हसीम इब्राहीम याला फोन लावले, सुरुवातीला त्याने या दोघांचे फोन घेणे टाळले. काही दिवासांनंतर त्याने आपले दोन्ही फोन नंबर बंद करुन टाकले. त्यामुळे या दोघांनी त्यांच्या साकीनाका व मालाड येथील कार्यालयात जाऊन पहाणी केली. मात्र दोन्ही कार्यालयांना टाळे असल्याचे आढळून आले. सदरचे कार्यालय बऱयाच दिवसांपासुन बंद असल्याचे तसेच त्यांच्या प्रमाणेच अनेक लोक विचारपूस करण्यासाठी येते असल्याचे आजुबाजुच्या व्यक्तींकडून त्यांना माहिती मिळाली. त्यामुळे या दोघांनी सदर त्रिकुटाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ते कुठेच सापडले नाहीत. त्यानंतर त्यांनी खारघर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मेट्रो सिटीत IS ची कमान महिलांच्या हाती; NIAचा मोठा खुलासा

 

Vikas Dubey Encounter : कुख्यात गँगस्टर विकास दुबेचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला समोर, झाला मोठा खुलासा

 

दहा रुपये, समोसा अन् घडली भयावह घटना; शाळकरी मुलाने गळफास लावून केली आत्महत्या 

 

वेदनादायी! शेतात घुसली म्हणून सांडणीचे कुऱ्हाडीनं कापले पाय; तडफडत सोडला जीव

 

एल्गार परिषद : वरावरा राव यांच्या प्रकृतीचा अहवाल द्या

 

दुर्घटना टळली! पश्चिम रेल्वे मार्गावर एक्सप्रेस आणि ट्रकचा अपघात, जीवितहानी नाही

 

Web Title: Fraud of Rs 85 lakh under the pretext of getting dealership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.