एटीएम कार्डद्वारे रक्कम काढून फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 02:16 AM2019-03-22T02:16:29+5:302019-03-22T02:16:41+5:30
एटीएममधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने महिलेकडील एटीएम कार्ड अनोळखी व्यक्तीने घेतले. त्यानंतर परस्पर रक्कम काढून महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार वाकड येथे उघडकीस आला.
पिंपरी - एटीएममधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने महिलेकडील एटीएम कार्ड अनोळखी व्यक्तीने घेतले. त्यानंतर परस्पर रक्कम काढून महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार वाकड येथे उघडकीस आला.
रेखा विजय पाखरे (वय ४१, रा. आदर्शनगर, हिंजवडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी पाखरे या १३ मार्चला डांगे चौकातील एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्या खात्यामधून पैसे निघत नसल्याने त्या वेळी एटीएम सेंटरमध्ये उभा असलेला एक अनोळखी व्यक्ती त्यांना म्हणाला, मी पैसे काढून देतो. त्यानंतर त्यांचे एटीएम कार्ड घेतले.
मात्र स्वाईप करुनही पैसे न निघाल्याने पाखरे यांना एटीएम कार्ड परत देताना पाखरे यांचे मूळ कार्ड न देता दुसरेच कार्ड दिले. तसेच आरोपीने पाखरे यांचे कार्ड स्वत:कडेच ठेवले. त्यानंतर एटीएम सेंटरमधून ७ हजार ५०० रुपये काढून घेत पाखरे यांची फसवणूक केली.