कोरोनाला घाबरून घोटाळेबाज भारतात आला, पोलिसांच्या जाळ्यात सापडला!

By पूनम अपराज | Published: March 23, 2020 09:25 PM2020-03-23T21:25:31+5:302020-03-23T21:27:02+5:30

महत्वाचे म्हणजे होम क्वारंटाइन असलेला हा आरोपी दुबईहून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाला आणि त्याला तिथे ताब्यात घेण्यात आले.

Fraudulent came back to india due to Corona scared and get arrested by police pda | कोरोनाला घाबरून घोटाळेबाज भारतात आला, पोलिसांच्या जाळ्यात सापडला!

कोरोनाला घाबरून घोटाळेबाज भारतात आला, पोलिसांच्या जाळ्यात सापडला!

Next
ठळक मुद्देन्यायालयाने या आरोपीला २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलिसांनी या प्रकरणी सीआरपीसी कलम २९९ नुसार आरोपपत्र दाखल केले होते. 

पूनम अपराज

मुंबई - ९०० कोटींच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात २०१७ पासून फरार असलेला पाहिजे आरोपी दुबईहून मुंबईत आला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. महत्वाचे म्हणजे होम क्वारंटाइन असलेला हा आरोपी दुबईहून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाला आणि त्याला तिथे ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्या आरोपीला एल. टी. मार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत असून दुसरीकडे पोलीस रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य पार पाडत आहेत. त्यातच तुरुंगातील कैदयांची गर्दी पाहता सर्वोच्च न्यायालयाने कच्च्या कैद्यांना सोडण्याचे आदेश पारित केले आहेत. तर, २०१७ पासून देश सोडून पळालेल्या एका आरोपीच्या मुसक्या एल. टी. मार्ग पोलिसांनी आवळल्या आहे. २०१७ साली ९०० कोटींचा चुना लावल्याप्रकरणी बाप आणि लेकाविरोधात भा. दं. वि. कलम ४०६, ४२० आणि १२० (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, दोघेही परदेशात जाऊन लपले होते. त्यानंतर वडिलांचा मृत्यू झाला तर मुलगा दुबईत लपून बसला होता. मात्र, दुबईत कोरोनाचा कहर पाहता आरोपी मुलाने पळ काढला आणि पोलिसांच्या तावडीत सापडला. मात्र, दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी सीआरपीसी कलम २९९ नुसार आरोपपत्र दाखल केले होते. 

अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे होम क्वारंटाइन असलेला हा आरोपी असल्याने त्याचे नाव उघड करू शकत नाही. मात्र, पोलिसांनी त्याला क्वारंटाइन असल्याने एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यातील कोठडीत एका खोलीत बंदिस्त करून ठेवले आहे. न्यायालयाने या आरोपीला २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र, कोरोनाची वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या आरोपीची चौकशी स्वतःची काळजी घेऊन करणं तितकंच महत्वाचं आहे. 

Web Title: Fraudulent came back to india due to Corona scared and get arrested by police pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.