कर्मचाऱ्यांच्या नावे १७ कोटींचा भामट्याने घातला गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 01:01 PM2019-09-11T13:01:58+5:302019-09-11T13:08:13+5:30
शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Next
ठळक मुद्दे किशोर राजेंद्र पाटील असे या संशयित भामट्याचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.
नाशिक - एका भामट्याने बॉश, महिंद्र अँड महिंद्रा, एचएएलसारख्या मोठ्या १० कंपन्या आणि निमसरकारी विभागातील एकूण १ हजार ८८८ कर्मचारी यांचे २०१६ ते २०१९ पर्यंत स्वतंत्र आयकर विवरण तयार करून आयकर कायद्याच्या विविध कलमान्वये कट कारस्थान रचून बनावट कपात दाखवून ऑनलाईन nos बंगळुरू येथे दाखल करून दाव्यात कर्मचाऱ्यांच्या नावे तब्बल १६ कोटी ७७ लाख ७४ हजार २३ रुपयांची रक्कम व्याजसह घेऊन अपहार करत शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. किशोर राजेंद्र पाटील असे या संशयित भामट्याचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.