व्हॉट्सॲप लॉटरीच्या नावावर फसवणुकीचा फंडा, २५ लाख जिंकल्याचा फेक मेसेज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 06:49 AM2020-12-25T06:49:51+5:302020-12-25T06:50:15+5:30
Crime News : या मेसेजमध्ये काैन बनेगा करोडपतीच्या वतीने ही रक्कम आपण जिंकली आहे, असेही सांगितले जात आहे.
नागपूर : सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी नवनवीन पद्धती शोधत असतात. सध्या व्हॉट्सॲपकडून आपल्याला २५ लाख रुपयांची लॉटरी लागली असल्याचे फेक मेसेज पाठवून लोकांची फसवणूक केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या मेसेजमध्ये काैन बनेगा करोडपतीच्या वतीने ही रक्कम आपण जिंकली आहे, असेही सांगितले जात आहे. अशा फेक मेसेजपासून वेळीच सावध होण्याचे आवाहन सायबर क्राइम विभागाने केले आहे.
अनेकांच्या मोबाइलवर अनोळखी व्यक्तीच्या मोबाइल नंबरवरून एक मेसेज पाठविला जात आहे. यासोबतच एक व्हिडीओसुद्धा आहे. यातील
व्यक्ती सांगतो की, ‘मी व्हॉट्सॲपचे मुख्य कार्यालय दिल्ली येथून
बोलत आहे. तुम्हाला व्हॉट्सॲपची
२५ लाख रुपयांची लॉटरी
लागली आहे. ही लॉटरी कशी
लागली याची माहिती देताना तो म्हणतो, व्हॉट्सॲपतर्फे आंतरराष्ट्रीय लकी ड्राॅ काढण्यात आला होता. पाच देशांचा लकी ड्राॅ काढण्यात
आला. यात तुमचा व्हॉट्सॲप नंबर पहिल्या नंबरवर आल्याने तुम्हाला २५ लाखांची लॉटरी लागली. ही २५ लाखांची रक्कम मुंबईतील स्टेट बँकेत पोहोचली आहे. ही रक्कम काढण्यासाठी मी तुम्हाला एक नंबर सेंड केला आहे. तो बँक व्यवस्थापकाचा नंबर असून, तो आपल्या व्हॉट्सॲपमध्ये सेव्ह करून त्याला फोन करा आणि २५ लाख रुपयांच्या लॉटरीबाबत विचारा. लॉटरीचा नंबर विचारला तर त्याचा नंबरही पाठविला असून तो सांगा. कॉल मात्र व्हॉट्सॲपद्वारेच करा, असे तो आवर्जून सांगतो.
हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. अनेक
लोक इतरांना सावध करण्यासाठीसुद्धा ते पाठवून हे फेक असून कुणीही
याला बळी पडू नये, असे आवाहन करीत आहेत. पोलिसांनी यावर तातडीने कारवाई करण्याची गरज आहे.