फुकट बिअर दिली नाही; बार व्यवस्थापकाला टोळक्याची मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 06:37 PM2021-11-28T18:37:22+5:302021-11-28T18:49:47+5:30

Beaten Bar Manager By Gang :विशेष बाब म्हणजे मारहाण करणा-या टोळक्याने व्यवस्थापकाच्या गळयातील सोन्याच्या चेन सह रेस्टॉरंटमधील सीसीटिव्हीचे डिव्हीआर आणि काउंटरमधील 76 हजाराची रोकड लंपास केल्याची तक्रार मानपाडा पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

Free beer not given; Bar manager beaten by gang | फुकट बिअर दिली नाही; बार व्यवस्थापकाला टोळक्याची मारहाण

फुकट बिअर दिली नाही; बार व्यवस्थापकाला टोळक्याची मारहाण

Next

डोंबिवली: शिवी देऊ नका असे सांगणा-या डिलीव्हरी बॉयला हॉटेलमध्ये घुसून चौघांनी मारहाण केल्याचा प्रकार मागील आठवडयात  पश्चिमेकडील गुप्ते क्रॉस रोडवरील प्रिती रेस्टॉरंट या हॉटेलात घडला असताना शनिवारी रात्री 12 वाजता पुर्वेकडील खंबाळपाडा परिसरातील फोर सिजन बार अॅण्ड रेस्टॉरंटमध्ये बीअर फुकट दिली नाही म्हणून व्यवस्थापकाला गंभीर मारहाण केल्याची घटना घडली.

विशेष बाब म्हणजे मारहाण करणा-या टोळक्याने व्यवस्थापकाच्या गळयातील सोन्याच्या चेन सह रेस्टॉरंटमधील सीसीटिव्हीचे डिव्हीआर आणि काउंटरमधील 76 हजाराची रोकड लंपास केल्याची तक्रार मानपाडा पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
या मारहाणीत बार रेस्टॉरंटचे व्यवस्थापक नित्यानंद भंडारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. भंडारी यांच्या तक्रारीवरून दिपेश म्हात्रे, विनायक पाटील याच्यासह त्यांच्या अन्य साथीदारांवर मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मारहाण करणारे दुचाकीवरून आले होते. त्यांनी भंडारी यांच्याकडे फुकट बीअर मागितली. बीअर दिली नाही या रागातून दिपेश, विनायक आणि त्यांच्या सहका-यांनी हाताने आणि लाथाबुक्यांनी भंडारी यांना मारहाण केली. कॅश काउंटरवरील संगणकाचीही यावेळी तोडफोड करण्यात आली. सीसीटिव्हीचे डिव्हीआर आणि काउंटरमधील 76 हजाराची रोकड चोरून नेली. मारहाण करताना भंडारी यांच्या गळयातील सोन्याची चेन खेचली आणि जीवे मारण्याची धमकी देत त्यांनी मारहाण केली. या घटनेप्रकरणी रविवारी दुपारी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Web Title: Free beer not given; Bar manager beaten by gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.