फेसबुकवरील मैत्रिणीने घातला ऑनलाईन ५ लाखाचा गंडा, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 06:24 PM2021-08-12T18:24:38+5:302021-08-12T18:26:28+5:30
Online Scam : याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात जेसिका विल्यम्स व विना मैड यांच्यावर गुन्हा दाखल झाला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
सदानंद नाईक
उल्हासनगर : फेसबुकवरील मैत्रिणीने सोन्याची चैन, Apple लॅपटॉप, आयफोन व घडयाळचा फोटो दाखवून युकेमधून गिफ़्ट पाठविल्याचे सांगून कस्टम फी ऑनलाइन भरण्यास सांगून ५ लाखाची महेश राजांनी यांची फसवणूक केली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरात राहणारे महेश राजांनी यांना फेसबुकवरील जेसीक विल्यम्स नावाच्या मैत्रिणीने सोन्याची चेन, अँपल लॅपटॉप, घड्याळ व आयफोनचा फोटो व्हॉटअप नंबर पाठवून युके वरून गिफ़्ट पाठविल्याचे सांगितले. गिफ़्ट वरील कस्टम फी विना मैड या नावाने दिलेल्या बँक खात्यात ऑनलाईन जमा करण्यास सांगितले. महेश राजांनी यांनी ५ लाख ४९९ रुपये रुपये ऑनलाईन पाठविले. सदर प्रकार २७ जुलै ते ५ ऑगस्ट २०२१ दरम्यान घडला असून आपली फसवणूक झाल्याचे समाजले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात जेसिका विल्यम्स व विना मैड यांच्यावर गुन्हा दाखल झाला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
हॅलो मी शरद पवार बोलतोय! बदल्यांसंदर्भात सिल्वर ओकवरून कॉल आल्याने मंत्रालयात उडाली खळबळ https://t.co/iZ3N6fRHR6
— Lokmat (@MiLOKMAT) August 12, 2021
नरभक्षक शिक्षकाने शरीराचे तुकडे तुकडे करून खाल्ले; डेटिंग पार्टनरला भेटण्यासाठी बोलावलं अन् केली हत्याhttps://t.co/RoaanwzZZB
— Lokmat (@MiLOKMAT) August 12, 2021