मैत्रिणीने कट रचून हॉटेलात विवाहितेला बोलावले; एकतर्फी प्रेमातून केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 09:51 PM2021-05-20T21:51:22+5:302021-05-20T21:53:24+5:30

Rape Case : महिलेच्या तक्रारीवरून डीएलएफ फेज -3 पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

The friend plotted and invited the married women to the hotel; Rape committed out of one-sided love | मैत्रिणीने कट रचून हॉटेलात विवाहितेला बोलावले; एकतर्फी प्रेमातून केला बलात्कार

मैत्रिणीने कट रचून हॉटेलात विवाहितेला बोलावले; एकतर्फी प्रेमातून केला बलात्कार

Next
ठळक मुद्दे2021 मध्ये, नवीन वर्षात, मैत्रीण सुश्मिता आणि सन्नी एकत्र म्हणाले आले आणि तिला म्हणाले नवीन वर्षाच्या दिवशी कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ. तुझा मानसिक तणाव कमी होईल.

गुडगाव - गुरु द्रोणाचार्य मेट्रो स्टेशनजवळील हॉटेलमध्ये मादक पदार्थ पाजून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. असा आरोप केला जात आहे की, मैत्रिणीने कट रचून तिला हॉटेलमध्ये बोलावले आणि एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियकराने विवाहित महिलेवर बलात्कार केला. हे कळताच तिच्या नवऱ्याने पीडितेचे संबंध तोडले. महिलेच्या तक्रारीवरून डीएलएफ फेज -3 पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

शाळा-महाविद्यालयाच्या वेळेत होता  मागे 
दिल्लीतील पीडित मुलीचे म्हणणे आहे की, तिच्या शेजारी राहणारा   सन्नी सिंह शाळा-कॉलेजच्या काळापासून मागे लागला आहे. शिकवणीला येताना जाताना देखील तो तिचा पाठपुरावा करत असे. त्यानंतर मैत्रीण सुष्मिता कटारियाने त्या तरूणाशी मैत्री केली. सन्नीच्या बहिणीने तक्रारदाराबरोबर शिकवणीचा अभ्यास सुरू केला. जेव्हा जेव्हा तक्रारदार महिलेच्या साखरपुड्याची चर्चा व्हायची तेव्हा आरोपी कोणत्या ना कोणत्या मार्गाने साखरपुडा तोडत असे. त्यामुळे पीडित व्यक्ती मानसिक तणावाखाली होती. तथापि, तिचे 28 एप्रिल 2019 रोजी लग्न झाले. या महिलेवरही औदासिन्यावर उपचार सुरू होते.

पीडित महिला 2 महिने रुग्णालयात राहिली
काही कालावधीने मैत्रिणीने अचानक तिला फोन केला आणि त्या कॉलला सन्नी सिंहचा जोडला गेला. पीडित पुन्हा अस्वस्थ झाली आणि तब्येत बिघडल्यामुळे पालकांनी तिला तिच्या सासरच्या घरी आणले. 2021 मध्ये, नवीन वर्षात, मैत्रीण सुश्मिता आणि सन्नी एकत्र म्हणाले आले आणि तिला म्हणाले नवीन वर्षाच्या दिवशी कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ. तुझा मानसिक तणाव कमी होईल. बर्‍याच जबरदस्तीनंतर 5 जानेवारी रोजी पीडित मुलगी त्यांच्यासह गुडगाव येथील  एमेरॉल्ड  हॉटेलमध्ये आली. तिघांनीही इथल्या खोलीत जेवण खाल्ले. चित्रपट पाहिला मग कोल्ड्रिंक प्यायल्यानंतर, तिला अचानक गुंगी आली आणि पुन्हा शुद्धीवर आल्यानंतर तिच्या अंगावर कपडे नव्हते. तेव्हा तिने या गोष्टीचा विरोध केला तेव्हा आरोपीने तिला सांगितले तू बदनाम होशील. ती स्त्री अस्वस्थ होऊ लागली आणि पुन्हा नैराश्यात गेली. सुमारे 2 महिन्यांपासून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. जेव्हा नवऱ्याला आणि कुटुंबीयांना हे कळले तेव्हा नवऱ्याने सर्व संबंध तोडले. आता अस्वस्थ होऊन विवाहितेणे दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली. तेथून ही बाब गुडगाव पोलिसांकडे आली.

पोलिस प्रवक्ते सुभाष बोकन यांनी सांगितले की आरोपी युवक आणि महिलेविरूद्ध डीएलएफ फेज -3 पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिस पथक याप्रकरणी कारवाई करत आहे.
 

Web Title: The friend plotted and invited the married women to the hotel; Rape committed out of one-sided love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.