प्रेयसीला शिवी दिली म्हणून मित्रावर झाडली गोळी, NRI खून प्रकरणाचं गूढ उकललं
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 19:43 IST2022-05-04T19:43:03+5:302022-05-04T19:43:25+5:30
Shot dead Case : तरनतारनच्या सुहावा गावात राहणारा २५ वर्षीय जितेंद्र पाल सिंह चार वर्षांपूर्वी कॅनडाला गेला होता.

प्रेयसीला शिवी दिली म्हणून मित्रावर झाडली गोळी, NRI खून प्रकरणाचं गूढ उकललं
आठवडाभरानंतर पंजाबमधील तरनतारनमध्ये एनआरआय जितेंद्र पाल सिंह यांच्या गोळीबारातपोलिसांना यश आले. या हत्येप्रकरणी जितेंद्रचा मित्र मणी आणि त्याची गर्लफ्रेंड लखविंदर कौर उर्फ निक्की यांना अटक करण्यात आली आहे. तर दुसरा आरोपी अद्याप फरार आहे.
तरनतारनच्या सुहावा गावात राहणारा २५ वर्षीय जितेंद्र पाल सिंह चार वर्षांपूर्वी कॅनडाला गेला होता. तेथून पीआर मिळाल्यानंतर जितेंद्र १६ एप्रिलला गावी परतला. पीआर मिळाल्याच्या आनंदात जितेंद्रने तरनतारनमधील एका रेस्टॉरंटमध्ये मित्रांसाठी पार्टी करण्याचा प्लॅन बनवला. 23 एप्रिल रोजी संध्याकाळी तो आपल्या तीन मित्रांसह रेस्टॉरंटमध्ये गेला होता. रेस्टॉरंटमधून बाहेर येताच दुचाकीस्वारांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.
या प्रकरणाचा खुलासा करताना एसएसपी रणजीत सिंह ढिल्लन म्हणाले की, जितेंद्र आणि मणी यांच्यात भांडण झाले होते. कारण जितेंद्र मणीची गर्लफ्रेंड लखविंदर कौरबद्दल उलटसुलट बोलला होता. मणीला हे अजिबात सहन झाले नाही आणि त्याने जितेंद्रला मारण्याचा कट रचला.
पोलीस कोठडीत आरोपी
सध्या पोलीस मणी आणि त्याच्या गर्लफ्रेंडची चौकशी करत आहेत. त्याचबरोबर तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. दुसरीकडे, जितेंद्रच्या आईची मुलाच्या मृत्यूनंतर प्रकृती वाईट आहे. ती आपल्या मुलाचे फोटो हातात धरून वारंवार म्हणत आहे की, 'बेटा, जर तू कॅनडातून आला नसतास तर ', जितेंद्र हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या कॅनेडियन पीआरमुळे दोघेही खूप खुश होते.