मित्रच निघाला मारेकरी : देशी कट्ट्याच्या वादातून आकाशची हत्या करून मंदिर परिसरातच पुरला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 09:09 PM2018-10-08T21:09:47+5:302018-10-08T21:10:02+5:30

 शास्त्री नगर परिसरातील एका मंदिराच्या शौचालयाच्या टाक्यात आकाशची चप्पल आढळली होती.

Friend went out: The dead body was buried in the temple premises by killing the sky through country-renowned dispute | मित्रच निघाला मारेकरी : देशी कट्ट्याच्या वादातून आकाशची हत्या करून मंदिर परिसरातच पुरला मृतदेह

मित्रच निघाला मारेकरी : देशी कट्ट्याच्या वादातून आकाशची हत्या करून मंदिर परिसरातच पुरला मृतदेह

Next

अकोला- एक महिन्यापासून बेपत्ता असलेल्या आकाश तुपे याचा अखेर मृतदेहच रविवारी रात्री उशिरा आढळून आला.एखाद्या सिनेमाचे कथानक होईल, अशी धक्कादायक घटना शहरात उघड झाली आहे. पोलिसांनी तब्बल 29 दिवसांनी या हत्येचा उलगडा केला आहे. आकाश तूपे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो 9 सप्टेंबरपासून बेपत्ता होता. हत्येप्रकरणी पोलिसांनी मंदिराचा पुजारी विठ्ठल सुखदेव भारती याला अटक केली आहे. आकाश तुपे आणि विठ्ठल सुखदेव भरती हे दोघे मित्र होते. मात्र भारती याने घेतलेला देशी कट्टा आकाश परत देत नाही म्हणून पुजार्‍याने त्याची हत्या केली. नंतर त्याचा मृतदेह मंदिराच्या परिसरात पुरल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

अकोल्यातील आकाश तुपे  हा युवक महिनाभरापासून बेपत्ता होता. आकाश 9 सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता दुकान बंद करून घराकडे निघाला होता. मात्र, रात्री उशीर झाला परंतु तो घरी पोहोचला नाही. आकाशच्या नातेवाईकांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार खदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या प्रकरणी पोलिसांना तपासादरम्यान 15 सप्टेंबर रोजी शास्त्री नगर परिसरातील एका मंदिराच्या शौचालयाच्या टाक्यात आकाशची चप्पल आढळली होती. त्या आधारावर पोलिसांनी मंदिराचा पुजारी विठ्ठल भारती भोवती तपास केंद्रीत केला. भारती देखील 9 सप्टेंबरपासून बेपत्ता असल्याचे समोर आल्याने पोलिसांचा पहिल्या दिवसापासून त्याच्यावर संशय होता. त्यानंतर पोलिसांना मंदिराचा पुजारी हा अहमदाबाद येथे असल्याची माहिती मिळाली. त्या आधारावर  पोलिस कर्मचारी संजय सोनटक्के, दिलीप उमाळे, जगदीश इंगळे यांनी अहमदाबादमधून पुजारी याला अटक केली.

पोलिस तपासात खळबळजनक तथ्य समोर...

आरोपी भारतीने आकाशची 9 सप्टेंबरला रात्री हत्या केली. नंतर मृतदेह शास्त्री नगर परिसरातील मंदिराच्या आवारात जमिनीत पुरल्याची कबुली दिली.या माहितीच्याआधारावर पोलिसांनी सोमवारी मंदिर परिसर खोदून आकाशचा मृतदेह बाहेर काढला आहे.

देशी कट्ट्‍याच्या वादातून आकाशची हत्या... 

आकाशची हत्या देशी कट्टाच्या वादातून झाली. आरोपीने गुन्हा कबूल केला आहे. पुढील तपास सुरु आहे. ही कारवाई खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली अशी माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी उमेश माने पाटील यांनी दिली. 

Web Title: Friend went out: The dead body was buried in the temple premises by killing the sky through country-renowned dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.