Friends pushed the young man from the third floor and took his life, the police revealed the mystery
मित्रांनी तिसऱ्या मजल्यावरून ढकलून तरुणाचा घेतला जीव, पोलिसांनी असं उलगडलं गूढ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 04:11 PM2022-05-12T16:11:08+5:302022-05-12T16:52:13+5:30
Murder Case : या प्रकरणी पोलिसांनी अमर उर्फ लखन शांताराम बारोट व पराग उर्फ बबलू रवींद्र आरखे या सह त्यांचा साक्षीदार निखिल राजेश सोनवणे या तीन जणांना अटक केली आहे.
Next
जळगाव : जळगावातील हत्या प्रकरणाची उकल करण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. तिसऱ्या मजल्यावरून ढकलून देत मित्राची हत्या करण्यात आली. मित्रांनीच मित्राचा शेवट केल्याचा आरोप आहे. जळगावात गोलाणी मार्केटमध्ये ही खळबळजनक घटना घडली. तिसऱ्या मजल्यावरुन ढकलून देत तरुणाची हत्या करण्यात आली होती. मुकेश राजापूर असे मृत युवकाचे नाव आहे.
मित्रांनी मुकेशला तिसऱ्या मजल्यावरून खाली ढकलत हत्या केल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलं आहे. सीसीटीव्ही फुटेजच्याआधारे पोलिसांनी या प्रकरणाची उकल केली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. जळगावातील तरुणाच्या कथित अपघाती मृत्यू प्रकरणाचे गूढ पोलिसांनी उलगडले आहे. तिसऱ्या मजल्यावरून ढकलून देत तरुणाची हत्या करण्यात आल्याचं उघडकीस आलं आहे. मित्रांनीच तरुणाची हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी अमर उर्फ लखन शांताराम बारोट व पराग उर्फ बबलू रवींद्र आरखे या सह त्यांचा साक्षीदार निखिल राजेश सोनवणे या तीन जणांना अटक केली आहे.
हत्या करुन मित्र स्वतः पोलीस ठाण्यात गेले होते. मुकेश इमारतीवरुन पडल्याची बतावणी करून पोलिसांना अपघात असल्याचे भासवले. मात्र, पोलिसांना या प्रकरणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपासणी केली. त्यानंतर हा प्रकार अपघात नसून हत्या असल्याचं उघडकीस झालं. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरु केला आहे. मृत मुकेश राजपूत हा चायनीजच्या गाडीवर काम करत होता सोमवारी काम आटपून नेहमीप्रमाणे तो घरी निघून गेला. त्यावेळी अमर उर्फ लखन बारोट व पराग उर्फ बबलू आरखे या दोघांनी मुकेशला पार्टी करायची असल्याचं सांगत गोलानी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावर नेले. तेथे मद्यपान करत असताना अमर व पराग या दोघांनी मुकेशसोबत वाद घातला.
या वादातून दोन्ही मित्रांनी मुकेशला तिसऱ्या मजल्यावरून ढकलून देत त्याची हत्या केली. घटनेनंतर अमर उर्फ लखन व पराग उर्फ बबलू हे दोघे पोलीस स्टेशनला जाऊन मुकेश वरून पडल्याची बतावणी करत पोलिसांना माहिती दिली.याप्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करत परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली असता मुकेशला वरून ढकलून देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यावरून पोलिसांनी अमर उर्फ लखन शांताराम बारोट आणि पराग उर्फ बबलू रवींद्र आरखे या दोघांना अटक केली असून त्यांचा सहकारी निखिल राजेश सोनवणे यालाही पोलिसांनी अटक केली आहे.