फेसबुकच्या मैत्रीनंतर यूपीच्या छत्तीसगढमध्ये पोहोचली तरूणी, कुटुंबियांनी मिळाली मृत्यूची बातमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 06:44 PM2021-10-27T18:44:16+5:302021-10-27T18:46:04+5:30
२५ वर्षीय सोनिया उर्फ लक्की त्यागी ४ ऑक्टोबरला घरातून कुणाला काही न सांगता निघून गेली होती. २१ ऑक्टोबरला तिच्या वडिलांनी तिची बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती.
यूपीच्या देवबंद जिल्ह्यातील नैनसोब येथील तरूणीला फेसबुकवर मैत्री करणं चांगलंच महागात पडलं आहे. या तरूणीला फेसबुकच्या मैत्रीमुळे जीव गमवावा लागला आहे. कुटुंबियांचा आरोप आहे की, तरूणीला छत्तीसगढला बोलवून तिला विषारी पदार्थ खाऊ घालून तिची हत्या करण्यात आली.
२५ वर्षीय सोनिया उर्फ लक्की त्यागी ४ ऑक्टोबरला घरातून कुणाला काही न सांगता निघून गेली होती. २१ ऑक्टोबरला तिच्या वडिलांनी तिची बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. पण २२ ऑक्टोबरला कुटुंबियांना पोलिसांकडून सांगण्यात आले की, तुमच्या मुलीचा छत्तीसगढमध्ये मृत्यू झाला. सूचना मिळताच कुटुंबिय छत्तीसगढला गेले आणि मुलीचा मृतदेह घेऊन आले.
मृतकाचे वडील मनीरामने सांगितलं की, त्यांच्या मुलीची फेसबुकवर मेघना नावाच्या तरूणीसोबत मैत्री झाली होती. सोनियाने तिचा मोठा भाऊ संदीपचं लग्न मेघनासोबत करण्याचा विषय काढला होता. मेघनाने तिच्या भावाला पसंत करत लग्नाला तयारी दर्शवली. ती सोनियाला म्हणाली की, तू छत्तीसगढला ये आणि मला तुझ्यासोबत घेऊन जा.
सोनिया काहीच न सांगता घरातून गेली होती. तरूणीबाबत पोलिसांना सूचना मिळाली होती की, एक तरूणी जंगलात वाईट अवस्थेत पडली आहे. पोलिसांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. तिची स्थिती गंभीर असल्याने तिला जिल्हा रूग्णालयात रेफर करण्यात आलं. मात्र, रस्त्यातच तिचं निधन झालं.
पोलिसांनी कुटुंबियांना सांगितलं की, आम्हाला तिच्याकडे मिळालेल्या कागदपत्रांवरून तिची ओळख पटवली. तरूणीने विषारी पदार्थांच सेवन केलं होतं. तेच कुटुंबियांचं मत आहे की, सोनियाची हत्या करण्यात आली. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.