मुकेश अंबानींना धमकीचा 'तो' ई-मेल आला कुठून? बेल्जियमच्या 'फेन्स मेल'शी पत्रव्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 07:15 AM2023-11-01T07:15:31+5:302023-11-01T07:16:07+5:30

मुंबई पोलिसांनी सीबीआय इंटरपोलच्या माध्यमातून सुरू केला पत्रव्यवहार

From where did Mukesh Ambani get the threatening e-mail? Correspondence with the Fence Mail Company of Belgium | मुकेश अंबानींना धमकीचा 'तो' ई-मेल आला कुठून? बेल्जियमच्या 'फेन्स मेल'शी पत्रव्यवहार

मुकेश अंबानींना धमकीचा 'तो' ई-मेल आला कुठून? बेल्जियमच्या 'फेन्स मेल'शी पत्रव्यवहार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांना येणारे धमकीचे ई-मेल हे बेल्जियम स्थित फेन्स मेल या कंपनीच्या सुविधेचा वापर करून पाठवल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी सीबीआय इंटरपोलच्या माध्यमातून कंपनीशी पत्रव्यवहार करत तपास सुरू केला आहे.

२७ ऑक्टोबर रोजी अंबानी यांना पहिला धमकीचा मेल आला होता. या धमकीच्या ई-मेलनंतर गावदेवी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्यापाठोपाठ तिसरा मेल आल्याने खळबळ उडाली आहे. पहिल्यांदा आरोपीने २० कोटी तर दुसऱ्यांदा २०० कोटीची मागणी केली होती. तसेच, आरोपीने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही ई-मेलमध्ये प्रश्न उपस्थित केले. ई-मेलमध्ये आरोपीने ‘आता ४०० कोटी रुपये वाढवले आहेत. माझा माग पोलिस काढू शकत नाहीत, तसेच ते मला अटक करू शकत नाहीत, त्यामुळे आम्हाला तुम्हाला मारण्यास काहीच हरकत नाही, तुमची कितीही चांगली  सुरक्षा असली तरीही. आमचा एक शूटर आहे जो तुम्हाला मारू शकतो.’ असे नमूद केले होते.

या आयडीवरून आली धमकी

हे मेल शादाब खान@फेन्स मेल या आयडीवरून करण्यात आले. बेल्जियम स्थित फेन्स मेल या कंपनीच्या अतिसुरक्षित अशा इंटरनेट सुविधेचा वापर करत हे ई-मेल आल्याची शक्यता आहे. ही एकमेव सुरक्षित आणि खासगी ई-मेल सेवा आहे. त्यानुसार मुंबई पोलिसांनी संबंधित कंपनीशी पत्रव्यवहार करत अधिक माहिती मागवली आहे. यामध्ये सीबीआय इंटरपोलची देखील मदत घेण्यात येत आहे. नेमका हा मेल कुठून? कोणी तसेच कुठल्या आयपी अँड्रेस वरून आला आहे? अशा विविध प्रश्नांची माहिती मागवण्यात आली आहे.

Web Title: From where did Mukesh Ambani get the threatening e-mail? Correspondence with the Fence Mail Company of Belgium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.