बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या ' किक २ ' मध्ये भूमिकेच्या बहाण्याने फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 15:28 IST2019-09-10T15:27:29+5:302019-09-10T15:28:55+5:30
सलमान खान यांचा किक २ येत्या डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे़. असा फोन या महिलेला जूनमध्ये आला़.

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या ' किक २ ' मध्ये भूमिकेच्या बहाण्याने फसवणूक
पुणे : लोकप्रिय अभिनेता सलमान खान याच्या 'किक २ ' चित्रपटात महिलेला सहायक भूमिका देण्याचे व तिच्या भावाला सहायक दिग्दर्शकाचे काम देण्याचा बहाणा करुन १ लाख ८२ हजार ६०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़. याप्रकरणी वारजे पोलिसांनी हिरल ठक्कर, अमर वुटला यांच्यासह त्यांच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़.
याप्रकरणी वारजे माळवाडी येथील एका ४४ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे़. हा प्रकार १५ जून ते ६ आॅगस्ट २०१९ दरम्यान घडला़ याबाबत पोलिसांनी सांगितले की, सलमान खान यांचा किक २ येत्या डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे़. या महिलेला जूनमध्ये एक फोन आला़. त्याने आपण सलमान खानच्या चित्रपटासाठी कास्टिंग करत असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला़. त्यांना सहायक भूमिका देतो, असे सांगितले़. त्यानंतर त्यांच्या भावाला सहायक दिग्दर्शक म्हणून काम मिळवून देतो, असे सांगितले़. त्यानंतर त्यांच्याशी वेगवेगळ्या आणखी दोघांनी संपर्क साधून वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून १ लाख ८२ हजार ६०० रुपये भरायला लावले़.त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला़. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले़. त्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधला़. तेथे गुन्हा दाखल होऊन तो अधिक तपासासाठी वारजे माळवाडी पोलिसांकडे आला आहे़.