डॉक्टरांकडूनच सोशल डिस्टनसिंगचा फज्जा; टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर ढोल-ताशाच्या गजरात स्टाफसह केला आनंद साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 10:13 IST2020-06-12T09:51:39+5:302020-06-12T10:13:41+5:30
माजलगाव तालुक्यात डॉ.देशपांडेनी उडवला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

डॉक्टरांकडूनच सोशल डिस्टनसिंगचा फज्जा; टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर ढोल-ताशाच्या गजरात स्टाफसह केला आनंद साजरा
माजलगाव : शहरातील देशपांडे हॉस्पिटल येथील कोरोना संशयित डॉक्टर व स्टाफ यांच्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. याच्या आनंदच्या भरात डाक्टरांनी आणि स्टाफने सोशल डिस्टंसिंग फज्जा उडवत ढोल ताशाच्या गजरात आनंद साजरा केला. यामुळे माजलगाव शहर पोलिसात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील देशपांडे हॉस्पिटल मध्ये दि.२ जुन ते ४ जून या कालावधीमध्ये धारुर तालुक्यातील आंबेवडगाव येथील ६५ वर्षाचा एक वयोवृद्ध रूग्ण आजारी असल्याने उपचार घेत होता .या उपचारादरम्यान संशयित रुग्ण हा मुंबईवरून आल्याने प्रशासनास कळले. यावर सदरील रुग्णाचे कोरोणा स्टेस्ट घेतली असता तो पॉझिटिव आढळला होता. त्यामुळे देशपांडे हॉस्पिटल डॉक्टरसह सर्व कर्मचारी स्टाफ व हॉस्पिटल सील करण्यात आले होते. परंतु आज दि.११ दुपारी २ वाजता देशपांडे हॉस्पिटलच्या सर्व कर्मचार्यांसह डॉक्टरांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने हॉस्पिटलच्या बाहेर ढोल ताशाच्या गजरात आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यात जिल्हाधिकारी यांच्या कोरोणाच्या परिस्थितीवर दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करत सोशल डिस्टन्सिग चे कोणतेही नियम न पाळता अनेक लोक एकत्र करून जमवुन डॉ.देशपांडेसह इतरांनी नाचत हा आनंद उत्सव केला.
याप्रकरणी डॉ.गजानन देशपांडे, डॉ. श्रेयस देशपांडे यांचासह १२ जणांविरुद्ध माजलगाव शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल अंबादास अनंत बेले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला, तपास पोलिस नाईक बीटी राऊत हे करत आहेत.